शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

देखभालीअंती चाचणी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:47 AM

बेलगंगा साखर कारखाना : खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

ठळक मुद्देकारखाना सुरू करण्याच्या हालचाली भुमीपूत्रांचा पुढाकारशेतकºयांच्या वाढल्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणाºया कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती चाचणी हंगाम घेतला जाणार आहे.चार स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत अंबाजी ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ. अभिजित पाटील यांनी मात्र आठ वर्षांपासून बंद असलेला बेलगंगा कारखाना विकत घेऊन तो सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी न्यायालयाने कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठवल्याने ऊस उत्पादकांसह सभासद व कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चित्रसेन पाटील यांनी गुंतवणूकदारांशी संवाद सुरू केला असून कारखान्याचे मेन्टनस करून ट्रायल सिझन घेण्याचे नियोजन केले असल्याचे 'लोकमत'शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.यंत्रे बंद असल्यामुळे कारखान्याचे मेन्टनस करावे लागणार असून यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मेन्टनस झाल्यानंतर ट्रायल सिझन घेणे शक्य होईल. याचबरोबर भांडवल उभारणीस तीन ते चार महिने लागतील, अर्थात पुढच्या गळीत हंगामात कारखान्याची यंत्रे निश्चितपणे धडधडतील, अशी आशा आहे. कंपनी स्थापन करून सर्वसामान्यांकडून शेअर्सरूपाने बेलगंगा कारखान्याची खरेदी करण्यासाठी पैसा उभा केला जात आहे. कारखान्यावर जिल्हा बँकेसह इतर अशी ८० कोटींहून अधिक देणी आहे.जल्हा बँकेला या व्यवहारापोटी ३९ कोटी २२ लाख रुपये अदा करावयाचे आहेत. यासाठी गुंतवणुकदारांकडून भांडवल उभारले जात आहे.पाच लाख मेट्रिक टन ऊस उपलब्धचाळीसगाव तालुक्यात ऊसाचे मोठे लागवड क्षेत्र आहे. बेलगंगेसाठी लागणा-या ३ लाख मेट्रीक टन ऊसा नंतरही ऊस शिल्लक राहतो. बेलगंगेत एका हंगामात अडीच लाख मेट्रीकटन ऊसाचे गाळप होते. यामुळे १०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होऊन ऊसतोड मजूर व पाचशेहून अधिक कामगारांना हक्काचा रोजगारही मिळतो. सद्यस्थितीत तालुक्यात पाच लाख मेट्रीक टन गाळप होईल, एवढा ऊस उपलब्ध आहे.आमदार उन्मेष पाटील यांनी बेलगंगेचा मुद्दा तापवूनच राजकारणात एन्ट्री केली. मांदुर्णे ते गुढे या त्यांच्या पदयात्रेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. २०१४ ची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर चित्रसेन पाटील यांच्यासह त्यांच्या तीन सहकाºयांनी कारखाना विकत घेतला. त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे नव्या बदलाच्या उंबरठ्यावर येतील असा मतप्रवाह आहे.