शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान - जळगावात साहित्यिकांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:28 PM

अजूनही मोठ्या संख्येने आहेत वाचक

ठळक मुद्देविशिष्ट विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकांचे फॅड , मात्र दर्जाही जपलाउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन

जळगाव : साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान आहे. लोक हल्ली वाचत नाहीत, असे सर्रास म्हटले जात असले तरीही मोठ्या संख्येने वाचक अजूनही टिकून आहेत, हे दिवाळी अंकांची संख्या व त्यांच्या खपावरून दिसून येते असा सूर मान्यवर साहित्यिकांनी बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘लोकमत’ शहर कार्यालय सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केला.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन पाटील, कवी अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी या मान्यवरांनी शहर कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधत दिवाळी अंकाच्या बाबत आपले मत व्यक्त केले.दिवाळी अंकातील दर्जेदार साहित्यामुळे मुळे नवीन स्फुर्ती मिळत असल्याचाही सूर या साहित्यिकांनी यावेळी व्यक्त केले.प्रा.किसन पाटीललहानपणी आमच्या गावातील वाचनालयात दिवाळी अंक यायचे. तसेच ज्येष्ठ बंधू शिक्षण घेत होते. ते देखील ते दिवाळी अंक आणायचे. त्यामुळे लहानपणीच दिवाळी अंकाशी परिचय झाला. दिवाळी अंकाच्यानिमित्ताने चांगली रंगीत छायाचित्र तर बघायला मिळायचीच पण काही दिवाळी अंकांमधून वात्रटिकाही वाचायला आनंद यायचा. सुरूवातीला त्यातील उपरोध कळायचा नाही. मात्र नंतर हळूहळू त्यातील उपरोध, गंमत कळायला सुरूवात झाली. दिवाळी अंक ही एकूणच भारतीय संस्कृतीला मराठीची देण आहे. अपवाद वगळला तर दिवाळी अंक हे मराठीतच निघातात. आजच्या स्थितीत सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक निघतात. साहित्य निर्मिती ही स्वान्त सुखाय असते. मात्र आत्मनिष्ठेकरून हे साहित्य समाजनिष्ठेकडे जाते. तेव्हा दिवाळी अंकांचे माध्यम त्यासाठी अधिक उपयोगी ठरते. त्यामुळे साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचेही योगदान मोठे आहे.प्रकाश किनगावकरलेखक, कवी लिहितो, मात्र त्याला लगेच प्रसिद्धी मिळत नाही. एखाद्या कवीला कविता संग्रह प्रसिद्ध करायला १०-१५ वर्ष वाट पहावी लागते. माझा पहिला कविता संग्रह १८ वर्षांनी प्रसिद्ध झाला. मात्र दिवाळी अंकामुळे साहित्याला लगेच प्रसिद्धी मिळते. अनेक दिवाळी अंकांसाठी चांगले साहित्य राखून ठेवले जाते. मोठ्या दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रकाशित होणे हा वेगळाच आनंद आहे. दिवाळी अंकातून चांगले साहित्य वाचकांपर्यंत जाते. लोक वाचतात. वेगवेगळे विषय अंकात असतात.अशोक कोतवालउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन असते. मी लिहायला सुरूवात केली तेव्हा खूप मासिकं होते. तेव्हा नामांकित मासिकात आपले साहित्य प्रसिद्ध व्हावे, असे वाटायचे. दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रसिद्ध व्हायचे तेव्हा फराळापेक्षाही दिवाळी अंकाची वाट बघायचो. अजूनही ‘दीपोत्सव’सारखे चांगले दिवाळी अंक साहित्यिकांना प्रेरणा देतात. उत्साह निर्माण करतात. तसेच प्रकाशकही ते दिवाळी अंक अधिकाधिक चांगले करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. वाचनीय अंक असतात. वाचकवर्गही दर्जेदार असतो. लोक वाचत नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे. लोक पुस्तक, दिवाळी अंक विकत घेतात. विशिष्ट विषयाला वाहिेलेले दिवाळी अंक हे फॅड आहे. मात्र काही अंकांनी दर्जा, वैशिष्ट्य जपले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीJalgaonजळगाव