यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, श्याम पांडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी नियम तुडवले पायदळी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी शहरात पद्मालय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली त्यानंतर काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दोन्ही कार्यक्रमात बोलतांना पटोले यांना मास्क लावला नव्हता. त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार प्रणिती शिंदे हे नेते देखील वारंवार मास्क काढत होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या जवळ जाऊन सत्कार केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा
नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. तसेच कोरोनाशी संबधित कामाचा आढावा देखील घेतला. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज असल्याने त्याच्याशी संबधित जिल्हा प्रशासनाची तयारी नेमकी काय आहे, याची माहिती घेतली. त्याबाबत काही सुचना देखील पटोले यांनी दिल्या.
गाळेधारक आंदोलकांची घेतली भेट
विश्रामगृहाकडुन जिल्हाधिकारी कार्यालयात जातांना नाना पटोले यांनी मनपाच्या मार्केटमधील गाळेधारकांचे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी भेट दिली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालया समोरच गेल्या आठवड्यापासून हे आंदोलन सुरू आहे.