शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
2
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
3
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
4
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
5
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
6
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
7
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
8
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
9
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
10
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
11
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
12
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
13
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
14
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
15
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
16
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
17
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
18
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
19
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
20
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...

शेतकरी हितासाठी देशात परिवर्तन करा - जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे शरद पवार यांचे गुलाबराव देवकर यांच्या प्रचार सभेत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:31 AM

शेतीमालाला भाव नाही, फसवी कर्जमाफी यामुळे गांजलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परिवर्तन करा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी एरंडोल येथे आयोजित सभेत केले.

ठळक मुद्देमोदी सरकारवर टीकास्त्रतीन राज्यात परिवर्तनशेतकऱ्यांची स्थिती बिकटआता कोणता गुन्हा दाखल करणार

एरंडोल, जि. जळगाव : शेतीमालाला भाव नाही, फसवी कर्जमाफी यामुळे गांजलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परिवर्तन करा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी एरंडोल येथे आयोजित सभेत केले.एरंडोल येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार दिलीप वाघ, संतोष चौधरी, मनिष जैन, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, डी.जी. पाटील, संजय गरूड, जगन सोनवणे, युवक कॉँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अनिल भाईदास पाटील, विलास भाऊलाल पाटील, मुकुंद सपकाळे, योगेश देसले आदींची उपस्थिती होती.तीन राज्यात परिवर्तनएरंडोल येथे वयाच्या २१व्या वर्षी प्रथम आल्याची आठवण सांगत, स्वातंत्र्य सेनानी सिताराम बिर्ला यांचे स्मरण शरद पवार यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोदींच्या राजवटीला जनता त्रासली आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपचा शंभर टक्के पराभव झाला. आता वेळ लोकसभेची आहे.देशात शेतीचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगताना पवार म्हणाले, मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपण कृषीमंत्री असताना यवतमाळ येथे एका शेतकºयाने आत्महत्या केली त्यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना बरोबर घेऊन गेलो होतो. तेथील परिस्थिती पाहून तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेतला. ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली.मुख्यमंत्री फडणवीस हे विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी ते म्हणत राज्यकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आता दोन वर्षात ११ हजार ९९८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या मग त्यांच्याविरूद्ध कोणता गुन्हा दाखल करावा? कांदा उत्पादक हैराण आहे. एका कांदा व्यापाºयाने उत्पादनाला भाव नाही म्हणून स्वत:ला कांद्यात गाडून घेतले. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी हितासाठी परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ. सतीश पाटील, अ‍ॅड. संदीप पाटील, अरूणभाई गुजराथी, अनिल भाईदास पाटील, जगन सोनवणे, योगेश देसले, डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.भाजपच्या सर्वेक्षणात देवकर आघाडीवरजळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने दोन उमेदवार बदलल्याचा मुद्दा घेऊन आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, अर्ज भरण्याची मुदत संपली म्हणून बरे झाले. अन्यथा भाजपने आणखी एक-दोन उमेदवार बदलले असते. देवकर यांच्या उमेदवारीचा भाजपला धाक आहे. त्यांच्या सर्वेक्षणात देवकर यांना ६५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आल्यानेच उमेदवार बदल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. पाडळसरे धरणावर बोलावे म्हणून मागणी होत होती.म्हणे माझे बोट धरून आले...एका कार्यक्रमात बरोबर असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो. मोदी नावाची ही भानगड मी राजकारणात आणली नाही. माझे बोट खराब करून का घ्यावे? असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला.पाडळसे धरणाला निधी दिला नाही- देवकरअजित पवार हे पाटबंधारे मंत्री असताना अमळनेरसह नजीकच्या तालुक्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्पास साडेचारशे कोटींचा निधी दिला. या सरकारने निधी न दिल्यानेच या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याचे उमेदवार गुलाबराव देवकर यावेळी बोलताना म्हणाले. हीच स्थिती पद्मालय, वरखेडे तांडा, बलून बंधाºयांची आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.‘चौकीदार चोर है’च्या घोषणाशरद पवार हे राफेल खरेदीचा विषय मांडत असताना उपस्थित जनसमुदायाने ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या.या प्रचारसभेसाठी जळगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती. तब्बल सव्वा तास उशीरा ही सभा सुरू झाली. त्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे झाली.पवार म्हणाले...आम्ही केवळ कर्ज माफी नाही तर शेती कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले.गहू-तांदळाला चांगला भाव दिला. तसेच गरीबांना २ रूपये किलो भावाने गहू व तांदुळ दिलेशेती मालाला भाव न मिळाल्यास परदेशातून धान्य आणावे लागेल.आमच्या काळात साखर, तांदुळ, कापूस निर्यात वाढलीराफेल विमानाची किंमत मनमोहनसिंह यांच्या काळात ३५० कोटी होती. मोदींनी ती १६६० कोटी केली४देशासाठी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांचे योगदान मोठे आहे. पण मोदी म्हणतात यांनी देशाचे वाटोळे केले.पायलट अभिनंदन भारतात परतल्यावर मोदी म्हणतात आमची ५६ इंची छाती आहे. मग कुलभुषण जाधव यांच्या सुटकेसाठी ही छाती काय करते?भाजपची सत्ता असतानाच कारगिल, अक्षरधाम मंदिर, अमरनाथ यात्रेवर हल्ला, गोध्रा हत्याकांड घडले. यांच्या मनगटात दम नाही हेच यातून सिद्ध होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव