परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मनुष्य शरीर एक अमूल्य विलक्षण वस्तू आहे. उन्नती करायची सर्वोत्तम साधन आहे. या मनुष्य शरीराला प्राप्त करून सर्वोत्तम सिद्धी प्राप्त करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे मात्र सर्वप्रथम आवश्यकता आहे ती ध्येय निश्चिती. जोपर्यंत मनुष्य ध्येय निश्चित करत नाहीत, तोपर्यंत मनुष्य म्हणणे योग्य नाही.कारण उद्देशबिना मनुष्य जीवन व्यर्थ आहे. जीवनाची सर्वोत्तम वस्तू जी आहे ती परमात्मा म्हणून मानवी जीवनाचे परम लक्ष आहे ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होय. परमात्मा प्राप्तीसाठी प्रधान साधन आहे म्हणजे जीवनाचे वेळेचे महत्त्व सदुपयोग. वेळ फार अमूल्य वस्तू आहे. या नशिबवान जगात लोक पैशाला फार महत्त्व देतात. फारच कमी लोक आहेत, जे वेळेला फार महत्त्व देतात. समय फार मौल्यवान आहे. आपण आपला वेळ देऊन पैसा संपत्ती कमवू शकतो मात्र पैसा संपत्ती देऊन पुन्हा वेळ प्राप्त करु शकत नाही.समय से विद्या प्राप्त कर सकते हो, विद्यासे समय नही प्राप्त कर सकते है, इसीलिये समय को महत्व दीजिए. आपल्याजवळ धनसंपत्ती यातील काहीच नाही. परंतु वेळ आहे तर जीवनाचे आधारभूत यावेळेला सावधानपूर्वक आपल्या उपयोगात आणला पाहिजे. उदाहरणार्थ सध्याच्या परिस्थितीत कोरोनो या विश्वावर थैमान माजले आहे. जगाच्या पाठीवर श्रीमंत देश आहेत चीन अमेरिका जपान इटली इंग्लंड सर्व देशांत अमाप संपत्ती आहे सुविधा सुद्धा आहेत पण त्यांच्याकडे वेळेचा फार अभाव आहे.आपल्याकडे पैसा कमी सुविधा कमी आहेत म्हणून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. भगवंत चिंतन करा, नामजप करा, अनुष्ठान करा, या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करा गोरगरिबांची सेवा करून वैद्यकीय, डॉक्टर्स, नर्स, पोलीस दल, जवान, पथक सेवादल सफाई कर्मचारी यांना सहकार्य करून देशसेवेत तन-मन-धनाने सहकार्य करा... आपला अमूल्य वेळेचा सदुपयोग करा हिच खरी जीवनाची श्रेष्ठता आहे.॥ काळ सारावा चिंतने ।एकांतवासी गंगा स्नाने ॥देवाच्या पूजने। प्रदक्षिणा तुळशीच्या॥तुकाराम महाराज हे आपला अमूल्य वेळ चिंतनामध्ये घालवित. साधना करत असताना संतांनी काही नियम घालून दिले आहेत.युक्त आहार विहार,नेम इंद्रीयासी सार।नसावी बासर, निद्र्रा बहु भाषण॥जीवनात कोणती साधना करत असताना युक्त आहार घ्या म्हणजे योग्य आहार उचित आहार आणि आपल्या इंद्रियांना वळण लावा भजन-कीर्तन वेळ घालवा. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे॥ लक्ष डोळ्यापुढे ठेवून प्रयत्न करा, साध्य अवश्य प्राप्त होईल. सध्या आपले कर्तव्य आहे सध्याच्या परिस्थितीत देश सेवा करणे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे. घरात बसून राष्ट्रसेवा करून मिळालेला वेळ महत्त्व समजून सत्कारणी खर्च करावा. त्याला वेळेचे महत्त्व कळेल तो आपला अमूल्य वेळ सदुपयोग खर्च करेल. स्वत:ची सुरक्षा करून आपल्या सध्याची प्राप्ती करेल. सध्या सर्वांचे एकच लक्ष आहे की, कोरोना रोगाला हरवणे व देशाला विजय प्राप्त करून देणे.-सुनीलशास्त्री महाराज, नशिराबाद ता.जळगाव
मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:35 PM