जळगाव,दि.15- : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहून एक प्रकारे विरोधकांना किंवा भाजपाला मदत करणा:या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अपात्र केले जाईल. यासंदर्भात कुठलीही गय केली जाणार नाही. तसेच या सदस्यांचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. हा अपघात कुणी घडविला याची माहितीदेखील घेतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
जि.प.अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर राहीले होते. त्यांचा नाशिकनजीक अपघातही झाला होता., असा मुद्दा वळसे पाटील यांच्याकडे उपस्थित केला असता त्यांनी या तिन्ही सदस्यांनी केलेले कृत्य योग्य नाही. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.
काँग्रेस भाजपासोबत जाणे चुकीचे
जि.प.मध्ये काँग्रेसचे सदस्य भाजपासोबत गेले.. निवडणूक लढताना मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होती.., आता संघर्षयात्रेतही ते पुन्हा आपल्यासोबत आले.. पण भाजपासोबत जाणे हा आपला विश्वासघात नाही का.., असा मुद्दा मांडला असता.. काँग्रेसचे सर्वच सदस्य जर भाजपासोबत गेले असतील तर ते चुकीचे आहे.. आता संघर्षयात्रा दोन्ही काँग्रेसने एकत्र काढायची असल्याचा निर्णय झाल्याने आम्ही सोबतच आहोत., जळगाव जि.प.त भाजपासोबत काँग्रेस गेली.. याबाबत मात्र आमचे जिल्हाध्यक्ष बोलतील.., असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी शाश्वत शेतीचा कार्यक्रम आधी सांगावा
कजर्माफीच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांनी मागील दोन अधिवेशनांमध्ये सकारात्मक भूमिका घेतली नाही.. ते जलयुक्त शिवार अभियान, शाश्वत शेतीचा मुद्दा मांडायचे.. पण त्यांनी शाश्वत शेतीचा कार्यक्रम सांगावा.. जलयुक्त शिवार अभियान पूर्वीही महात्मा फुले यांच्या नावाने आमच्या काळात होते.. फक्त या योजनेचे नाव बदलले, असेही वळसे पाटील म्हणाले.
शिवसेना कजर्मुक्तीच्या बाजूने
शिवसेनेचे सदस्य हे कजर्मुक्तीच्या बाजूने आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सेनेने कजर्माफीची भूमिका मांडली. आपण अल्पमतात येऊ म्हणून भाजपाने 19 आमदारांचे निलंबन केले व अधिवेशन पार पाडून नेले. आता मात्र सेनेचे नेते मुंबईत पंतप्रधानांसोबत जेवण करून आले आहे. त्यांची भूमिका आता बदलली का, ते सांगता येणार नाही, असेही वळसे पाटील गमतीने म्हणाले.