ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - ओपीएम महिला उद्योगाच्या नावाने काम देवून पैसे कमविण्याचे आमिष दाखवून महापालिकेच्या माजी बचतगट निरिक्षकाने जिल्हाभरातील 2361 महिलांची 30 लाखात फसवणूक केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आह़े दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने संबंधित फसवूणक झालेल्या शहरातील 20 ते 25 महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे गा:हाणे मांडल़े यावेळी त्यांनी झालेला प्रकार लक्षात घेत गुन्हा दाखल करुन कारवाईचे आश्वासन दिले आह़ेफसवणूक झालेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, मनोज आधार नाथबाबा (रा़ खंडेराव नगर, पिंप्राळा) हे महापालिकेत बचतगट निरिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला आह़े दरम्यान त्यांनी महापालिकेत कार्यरत असताना बचटगट संघ स्थापन करण्याच्या कामानिमित्ताने त्यांच्याकडे बचतगट असलेल्या महिलांची माहिती घेतली होती़25 तारखेर्पयत पैसे परत करण्याबाबत लिहून दिले स्टॅम्प पेपरवरपैशांसाठी महिलांनी नाथबाबाकडे तगादा लावला़ 22 डिसेंबर रोजी नाथबाबाने महिलांना 100 रुपयांच्या स्टॅपपेपरवर संबंधित 2361 महिलांचे सभासद पावती रक्कम 23 लाख 61 हजार रुपये व मजूरी, पगाराची रक्कम 7 लाख असे 30 लाखाची रक्कम 25 डिसेंबर रोजी र्पयत देईल न दिल्यास कायदेशीर करावाई करावी असे लिहून दिले होत़े त्यानुसार पैसे परत न मिळाल्याने 25 रोजी महिलांनी नाथबाबाला संपर्क साधला़ भ्रमणध्वनीवरुन प्रतिसाद देत नसल्याने दुपारी नाथबाबाच्या खंडेरावनगरातील घर गाठून गोंधळ घातला़ पोलिसांच्या हद्दीचा वाद अन् महिलांची भटकंतीमहिलांनी सोमवारी दुपारी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठल़े तेथे तक्रार न घेता पोलिसांनी स्टॅम्पपेपर शहर पोलिसांच्या हद्दीत बनिवला असल्याचे सांगत शहर पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितल़े अखेर महिलांनी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले व अधीक्षकांकडे गा:हाणे मांडल़े यादरम्यान अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होत़े अधीक्षकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल़े.. अन् महिलांना बसला धक्कापैशांच्या आमिषापोटी महिलांनी स्वत: सभासद होत इतरही महिलांना सभासद केल़े प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे पैसे जमा करुन वेळच्या वेळी नाथबाबा याच्याकडे दिल़े ठरल्याप्रमाणे काही भागात नाथबाबा यांनी मसाला, गुलाल, मुलतानी माती, रांगोळी बनविण्याचे काम देवून वेळच्या वेळी कामानुसार पैसे दिल़े मात्र काही ठिकाणी अद्यार्पयत कामच दिलेले नाही़ या सर्व महिलांनी नाथबाबा यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. महिलांना आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यावर धक्काच बसला. दरम्यान ज्या-ज्या महिलांनी पैसे दिले आहे, त्या महिला, प्रमुख महिलेच्या घरी गेल्या व त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत आहे. त्यामुळे दररोज वाद होत आहे. महिलांचा असा केला विश्वास संपादननाथबाबा यांनी ऑगस्ट महिन्यात ओपीएम महिला उद्योग नावाने व्यवसाय सुरु केला असून त्याव्दारे तुम्हाला काम मिळवून देईल़ त्या कामाचा प्रत्येक महिलेला मोबदला मिळेल, असे सांगत नाथबाबा याने महिलांचा विश्वास संपादन केला़ त्यानुसार 1 हजार रुपयाची पावती फाडून ओपीएम महिलांचे उद्योगाच्या सभासदत्व स्विकारावे लागेल, असेही त्याने सांगितल़े एका महिलेला प्रमुख बनवून त्या महिलेच्या माध्यमातून सभादत्वाची साखळी तयार केली़ 25 प्रमुखांच्या माध्यमातून भुसावळ, धरणगाव, जामनेर,जळगाव अशा जिल्हाभरातील एकूण 2 हजार 361 महिला यात जुळल्या आहेत़ नाथबाबाचा कीर्तनकारालाही दणका.. हनुमान नगरातील एका नातेवाईकाकडे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी एक कीर्तनकार जळगावात आले होते. यादरम्यान नाथबाबाने त्यांना जाळ्यात ओढले. कीर्तनकाराच्या गाडीचा भाडेतत्वावर वापर करुन ठिकठिकणाच्या महिलांकडून पैसे जमविल़े गाडीच्या भाडय़ाचे पैसे चुकवून 15 ते 20 हजारात चुना लावला. त्यामुळे कीर्तनकारही महिलांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करण्यासाठी पोहचले होते.