जळगाव : बारा लाखाचे कर्ज व शेतातील पिकांची बिकट स्थिती अशा दुहेरी चिंतेत असलेल्या जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील भगवान आत्माराम पाटील (३७) या तरुण शेतकºयाने शुक्रवारी सकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.भगवान पाटील व त्यांच्या दोन भावांची माळपिंप्री शिवारात शेती असून ते सर्वजण शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी सकाळी भगवान पाटील व त्यांचे भाऊ विनोद पाटील हे शेतात गेलेले होते. शेतात दोघेही जेवण करीत असताना भगवान पाटील यांनी शौचास जाऊन येतो असे सांगून तेथून गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी विनोद पाटील गेले असता भगवान पाटील विहीरजवळ उलटी करीत असल्याचे आढळून आले. त्या वेळी त्यांना दुपारी साडे बारा वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास भगवान पाटील यांचा मृत्यू झाला.
माळपिंप्रीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 8:19 PM
बारा लाखाचे कर्ज व शेतातील पिकांची बिकट स्थिती अशा दुहेरी चिंतेत असलेल्या जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील भगवान आत्माराम पाटील (३७) या तरुण शेतकºयाने शुक्रवारी सकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.
ठळक मुद्देमाळपिंप्री येथील शेतातच घेतले विष१२ लाखांचे होते डोक्यावर कर्जजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू