पारोळा : येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गणेशमूर्ती साकारणे स्पर्धा संपन्न झाली. यात विद्यालयातून पहिली ते सातवीच्यो ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, विजय बडगुजर, राधिका बडगुजर उपस्थित होते. शाडू तसेच साध्या मातीपासून सुंदर गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केले. बक्षिसपात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयत्ता दुसरीच्या गटातून सार्थक राकेश शिंपी, मयूर पितांबर भोई, ओम प्रकाश पाटील, सृष्टी सचिन चौधरी. तिसरीच्या गटातून अमेय विलास माळी, रुद्र दत्तात्रय पाटील, श्रेयस गिरीश पाठक, सोमनाथ भाऊसाहेब पाटील. चौथीच्या गटातून श्रीहन लक्ष्मीकांत लोहार, वेदांत भगवान चौधरी, रेवती नितीन पाटील, रोहित मनोहर कुंभार. पाचवीच्या गटातून ऋग्वेद सुनील चौधरी, चिन्मयी भूषण कासार, गौरव चंद्रकांत सोनवणे. इयत्ता सहावीतून भावेश श्रीराम महाजन, भूमी राकेश शिंपी, यश विजय भोई, तुषार रवींद्र पारधी. सातवीतून संदेश गौतम सरदार, निलाक्षी प्रवीण पाटील, कुंदन गंगाधर जाधव, हार्दिक दीपक पाटील आदींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. परीक्षक पालक प्रतिनिधी सुचिता पाटील, वैशाली शिंपी या होत्या. यशस्वीतेसाठी रेखा बडगुजर, प्रदीप चांदवडे, सचिन पाटील, अर्चना भावसार, शुभांगी अहिरे, कविता कापुरे यांनी परिश्रम घेतले.