लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून निवडणुकीपूर्वी सुरू केलेली विकासकामे गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. नवीन पदाधिकाऱ्यांनी या कामांना पुन्हा गती दिल्याने अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे.
रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या प्रारंभावेळी सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच आशमाबी शेख नाशीर, ग्रा. पं. सदस्या साधना चौधरी, सुनीता चौधरी, रंजना ढाके, आरती पाटील, लताबाई तिवारी, अंजनाबाई शिंदे, कल्पना शिंदे, विलास सोनवणे, शैलेंद्र पाटील, अमर पाटील, संतोष कोळी, अनिस पटेल, एजाज पटेल, गोपाळकृष्ण मोरे, अनंता चौधरी, ग्रामसेवक आर. आर. मनोरे आदी
उपस्थित होते. दरम्यान, वित्त आयोगाची कामे निवडणूक काळात रखडल्याने रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी तसेच वाळु विखुरल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यासंदर्भात 'लोकमत'मध्येही वृत्त प्रसिद्ध झाले होते. उशिरा का होईना एकदाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनीही त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
------------------
(फोटो- १६)
ममुराबाद येथे १४ व्या वित्त आयोगातून सुरू झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करताना सरपंच हेमंत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अमर पाटील, विलास सोनवणे, गोपाळकृष्ण मोरे, ग्रामसेवक आर. आर. मनोरे, अनंता चौधरी, जितेंद्र ढाके आदी.(फोटो- १६)
ममुराबाद येथे १४ व्या वित्त आयोगातून सुरू झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करताना सरपंच हेमंत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अमर पाटील, विलास सोनवणे, गोपाळकृष्ण मोरे, ग्रामसेवक आर. आर. मनोरे, अनंता चौधरी, जितेंद्र ढाके आदी.