लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरातील नांद्राखुर्द, आव्हाणे, खेडी, सुजदे, असोदा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रकाशित केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यानंतर लगेच विशेषतः नांद्रा रस्त्याचे काम सुरू केले असून, साधारण एक किलोमीटर अंतरासाठी सुमारे ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे ममुराबाद भागातील बहुतांश रस्ते वाहतूक योग्य राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांसह वाहनधारकांना त्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत. नांद्रा, आसोदा, सुजदे, धामणगाव, खेडी- आव्हाणे गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती जास्त विदारक झाली आहे. याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर ममुराबादकडून नांद्रा गावाकडे जाणाऱ्या साधारण १२०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने ठेकेदारामार्फत तातडीने सुरू केले आहे. त्याअंतर्गत मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदरचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
--------
फोटो-
ममुराबाद ते नांद्राखुर्द रस्त्याचे काम जि. प. बांधकाम विभागाने ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सुरू केले आहे. (जितेंद्र पाटील)