सचिन देवजळगाव : २१ व्या शतकात भारताने विज्ञान तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती केली आहे. दुसरीकडे आजही चंद्रग्रहण, सुर्यग्रहण पाळले जाते. अमावस्येला कुठलेही शुभकार्य केले जात नाही. अवकाशातील घडणाऱ्या बदलानुसार ग्रहणाच्या घटना घडतच असतात. अमावस्येला काळरात्र असते, हादेखील अवकाशातील घडणाºया बदलाचाच एक भाग आहे. त्यामुळे ग्रहण आणि अमावस्येशी माणसाचा कुठलाही संबंध नाही. असे मत खगोल शास्त्राचे अभ्यासक तथा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. नितीन शिंदे (इस्लामपूर) यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते शुक्रवारी जळगावात आले असता, त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्याशी झालेली ही बातचित.प्रश्न : ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे?उत्तर : खरं तर ग्रह ताºयांचा अभ्यास हा दिवसा नाही तर रात्री केला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवसा पुस्तकी ज्ञान देऊन रात्री दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रह, तारे व अवकाशातील बदलांची माहिती दिली पाहिजे. मात्र, आज शिक्षकांकडून पुस्तकी ज्ञानाव्यतीरिक्त प्रत्यक्ष प्रॅक्टीकलवर भर दिला जात नाही, असा अनुभव आहे.प्रश्न : ‘चांद्रयान -२’ मोहिमेबद्दल काय सांगाल?उत्तर : चांद्रयान मोहिम आज पूर्णत : यशस्वी झाली नसली तरी, संशोधक या मागची कारणे शोधून नव्याने प्रयत्न करीत आहेत. खगोल क्षेत्रात संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना या मोहिमेमुळे एक मोठी प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात नवीन संशोधक घडणार असून, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.प्रश्न : ग्रह-ताºयांचा मानवाशी संबंध असतो, असे म्हटले जाते. याबद्दल आपले मत काय?उत्तर : कुठलाही ग्रह वा ताºयाचा मानवाशी काहीही संबंध नाही. ज्योतिष मात्र ग्रह-ताºयांचा संबंध मानवाशी जोडत आहेत. मंगळ असल्यामुळे लग्न करु नका, शनीचा फेरा असल्यामुळे साडेसाती आहे, असे सांगतात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाºया प्रत्येकाने याबद्दल सखोल विचार करणे गरजेचे आहे.अमावस्येला कुठलेही शुभ कार्य करु नये, असे सांगितले जाते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया ृअमावस्येलाच जिंकल्या आहेत. त्यामुळे आपण अमावस्येला शुभ काम करु नये, असे सांगणाºयांचे मत चुकीचेच आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.या सर्व प्रकाराबद्दल समाजात जनजागृतीसाठी आपल्या मार्फत काय प्रयत्न सुरु आहेत?अवकाशातील विविध ग्रह आणि तारे यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना, नागरिकांना रंजक माहिती मिळावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून सतत कार्यशाळा घेत असतो. दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रह-ताºयाबद्दल सखोल ज्ञान देऊन, त्यांच्यातील गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करित असतो. तसेच येत्या २६ नोव्हेंबरला सुर्यग्रहण असून, या ग्रहणाविषयी विद्यार्थी, नागरिकांना माहिती व्हावी, त्यांच्यातील ग्रहणासबंधी गैरसमज दूर व्हावे. यासाठी इस्लामपूरला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ग्रहताºयांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून करा, खागोलीय घडामोडी संदर्भात अंधश्रद्धांना बळी पडू नका. ग्रहाचा मानव प्राण्याशी काडीमात्र संबंध नाही, या पुढेही संबंध राहणार नाही, सर्वानी आनंदी जीवन जगावे- प्रा. नितीन शिंदे
ग्रहण व अमावस्येशी माणसाचा संबंध नाही - - प्रा. नितीन शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:59 PM