चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली. यामुळे परिसरातील बागायती शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन सोहळा झाला.१९०५ दशलघफू साठवण जलसाठवणा क्षमता असलेले हे धरण दुष्काळामुळे कोरडेठाक होते. भर पावसाळ्यातही त्यात पुरेसे पाणी न आल्याने धरणावर अवलंबून असणारे शेती क्षेत्रही धोक्यात आले होते. उन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यंदा अवकाळी पाऊस मन्याडसाठी लाभदायक ठरल्याने ते १०० टक्के भरले. याचा मोठा फायदा रब्बी हंगामाला होणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मंत्रोच्चारात जलपूजन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यात सिंचन पॅटर्न राबविण्याची ग्वाही दिली. सिंचनाचे प्रश्न सोडविल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असून त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, भीमराव खलाणे, बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, रोहन सूर्यवंशी, गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मन्याड धरण ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:10 PM
गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे कोरडेठाक असलेले मन्याड धरण यंदा १०० टक्के भरले. गुरुवारी धरणाने शतकी सलामी दिली.
ठळक मुद्देआमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले जलपूजनउन्हाळ्यात धरणात पाणी नसल्याने या भागात मोठी पाणीटंचाईदेखील उदभवली होती