शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

मांडकी खु ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 4:27 PM

ग्रामस्थांचे रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे

पाचोरा- तालुक्यातील मांडकी खुर्द गावाला रस्ताच नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याअभावी चिखलातून मार्ग काढत हाल सोसावे लागत आहे. याबाबत मांडकी ग्रामस्थांनी महिलांसह तहसीलदारांना निवेदन देऊन रस्त्यासाठी साकडे घातले आहे.मांडकी ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांडकी हे गाव गिरणा नदी पात्रालागत असल्याने नदीमुळे गावाला धोका होत असतो. यासाठी शासनाने या गावाचे सन २००८-०९ साली पुनर्वसन केले.गावात भिल्ल आदिवासी वस्ती असून गावाची ४५० लोकसंख्या आहे. गावात एकही पिठाची गिरणी नाही व दुकान दवाखाना नाही. त्यामुळे ग्रामस्थ महिलांना शेजारील पुनगाव येथे जाणे - येणे करावे लागते. गावास जोडणारा रस्ता वारंवार मागणी करूनही झाला नाही. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून या बहुसंख्य आदिवासी रहिवासी असलेल्या या गावाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पिठाची गिरणी किराणा दुकान नसल्याने गावकऱ्यांना बाहेरगावी जावे लागत. त्यातच आजारी रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यास कोणतेही वाहन रस्त्यांवर चालू शकत नाही. यामुळे आमचे जिणे असाह्य झाले आहे. यासाठी तत्काळ रस्ता करावा व गावचे पुनर्वसन करावे अशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनावर ग्रा प सदस्य चिंतामण पाटील, अनिल परदेशी, देवराज वाघ, सुभाष भिल, राजाराम पाटील, यशोदाबाई भिल, अक्कबाई भिल, मंगलाबाई भिल, मीराबाई मराठे, इंदुबई भिल, सुनंदा मराठे, अक्कबाई भीमराव भिल, आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.दरम्यान तालुक्यात सर्वत्र विकास कामांचा झंझावात चालू असताना मांडकी गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत असून गावाकडे कुणीही अधिकारी तसेच राजकीय मंडळी फिरकत नाही.यामुळे आमदार तसेच जि. प. सदस्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.