सध्या कलीयुग सुरू आहे. या कलियुगात मनोरंजनाचे अनेक साधने आहेत. या वातावरणातही आपण जर कथा ऐकत असाल तर आपल्यावर नक्कीच प्रभूची कृपा आहे, असे समजा. ‘अति हरिकृपा जे ही पर होई... ’ प्रभूला प्रार्थना करू या. हे प्रभू मला शक्ती द्या. एवढी शक्ती द्या, की मी आपल्या धामाची यात्रा करु शकेल. असं म्हणतात की मनुष्य शेवटच्या काळात सत्य बोलत असतो. तेच मी तुुम्हाला सांगणार आहे. हेच प्रभूंनीही सांगितले आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनात जायला निघाले त्यावेळी त्यांनी अयोध्येतील लोकांची बैठक बोलविली. त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. ‘ बडे भाग मानुस तन पावा ’ परमेश्वर आपल्याला पशु,पक्षी, वृक्ष असे काहीही बनवू शकला असता. पण प्रभूंनी आपल्याला मनुष्य बनविले. कारण या शरीरामुळेच आपल्याला पुण्य करण्याची संधी मिळाली आहे. ती आपण आपण दडवू नये. कारण साधन धाम मोक्ष कर द्वारा.... प्रभूचा दरवाजा उघडण्यासाठी मनुष्याकडे हवे असते ज्ञान..आपल्याजवळ भक्तीची शक्ती असते. म्हणूनच आपण देवाला प्रार्थना करावी. परमेश्वरा आम्ही तुला शरण आलो आहोत. आईने आपल्याला कडेवर घ्यावे, असे ज्यावेळी लहान मुलाला वाटते. त्यावेळी तो आपले दोन्ही हात वर करतो आणि न कळत सांगत असतो. मला घे म्हणून. तसेच देवाचेही आहे. आपली इच्छा झाली तर देवही आपल्या मनात असेल ती इच्छा पूर्ण करीत असतो.आपण कथेला का येतो. गोस्वामी तुलसीदासांनी म्हटले आहे. कथेत येऊन जो परमेश्वराचे नाव लयीत गायील, त्याच्याकडे सिद्धी आपोआप येईल. आता तर कलीयुग सुरु आहे आणि अपेक्षेशिवाय आरती करणार नाही, आपण आरतीच तशी म्हणतो... मनात जेवढे दु:ख असेल ते मिटावे. आरतीच्या मागील ही भूमिका असते. मनुष्य ज्याची आरती करतो जो आपणास काही तरी देत असतो. प्रत्येक मनुष्याच्या मनातील एका कोपऱ्यात अपेक्षा उभ्या असतात. या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी तो काही तरी मागत असतो.जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही. त्यासाठी एक अद्दश्य शक्ती या मागे उभी आहे. कथेचा उद्देश एकच असतो ते म्हणजे सर्वांचे घर मंगलभवन बनावे. श्रीरामाच्या नावाला तर स्वत: शिवही जपत असतात. ‘उमा सहीत जपत पुरारी..’ एवढेच नाही तर ‘राम रामेति रामेति राम नाम वरानमे’... या ओळींप्रमाणेच प्रत्येक घरात राम नाम अर्थात परमेश्वराचे नाव घेतले जाईल, त्या घराचे मंगलभवन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. आपण सरस्वतीची पूजा कशासाठी करतो तर ज्ञान मिळावे, यासाठीच. जगदगुरु शंकराचार्य यांना अडीच हजार वर्षापूर्वी एकाने विचारले होते. ज्ञान म्हणजे काय? यावर शंकराचार्य म्हणाले होते, जीवनात दुगुर्णांचा नाश करते ते म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाची इतकी साधी आणि सरळ व्याख्या तुम्हाला कुठेही सापडणार नाही.- अतुलकृष्ण भारद्वाज, रामकथाकार
मंगल भवन अंमगल हारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 8:42 PM