शेंदुर्णी, ता. जामनेर : अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनीषा सुनील चौधरी हिने उदयपूर (राजस्थान) येथे झालेल्या पश्चिम विभागीय अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या यशाने गरुड महाविद्यालयाची अविष्कार स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी मनीषा चौधरी हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत अविष्कार स्पर्धेत गरुड महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली. विद्यापीठ अंतर्गत पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन ९ ते १२ जानेवारी दरम्यान उदयपूर येथे पश्चिम विभागीय अन्वेषण २०१९ अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतही मनीषा चौधरीने यश संपादन केले.महिलांसाठी बहुपयोगी बाटलीने केला ‘अविष्कार’मनीषा चौधरी हिने बहुपयोगी बाटली तयार केली आहे. पिण्यासाठी पाणी, टॉर्च, कॅमेरा, जीपीएस, रेकॉर्डिंग, सायरन, चार्जर हे सर्व काही एकाच बाटलीत तयार केले आहे. मनिषाला गरुड महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत देशमुख व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
गरुड विद्यालयाची मनीषा चौधरी पश्चिम विभागीय अविष्कार स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:23 PM