शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

‘मनोबल’ची महाराष्ट्रभरातील अपंग अनाथ विद्यार्थ्यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनची सर्वांनाच झळ सहन करावी लागत असताना दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनची सर्वांनाच झळ सहन करावी लागत असताना दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी हा काळ अधिकच आव्हानात्मक ठरत आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांना घरभाडे, किराणा साहित्य व इतर आवश्यक मदत मिळाल्यास ती दीपस्तंभच ठरते. याचा प्रत्यक्ष अनुभव राज्यभरातील विद्यार्थी जळगावातील मदतीमुळे घेत असून, यातून त्यांचे एक प्रकारे मनोबलच वाढले आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ फाउंडेशन संस्था पुढे सरसावली असून, या संस्थेने ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ या उपक्रमाअंतर्गत २१० अनाथ व २४० अपंग विद्यार्थ्यांना आधार दिला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व सर्वच क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. याच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अजूनही हतबल आहे. भारतातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन लागू करण्यात आले असून या निर्बंधांचा काळ सर्वांसाठी अडचणीचा आहे. यात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी तो अधिक जास्त आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ फाउंडेशन पुढे आले आहे.

४५० विद्यार्थ्यांना आधार

दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी निःशुल्क उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यात आता कोरोनाचे संकट ओढावले असताना महाराष्ट्रभरातील आर्थिकदृष्ट्या असक्षम अपंग अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही शिक्षण, आरोग्य व इतर कुठलीही अत्यावश्यक मदत दीपस्तंभ मनोबल मार्फत करण्यात येत आहे. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ या उपक्रमाअंतर्गत २१० अनाथ व २४० अपंग विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट घरभाड्याची रक्कम जमा करण्यात आली असून, काही जणांना किराणा साहित्यासाठी आर्थिक मदत तर काहींना थेट साहित्य देण्यात आले आहे.

स्वत: काम करीत उदरनिर्वाह करणारे अडचणीत

कोल्हापूर येथे असलेले ९४ गरजू अनाथ विद्यार्थी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी अडचणीत आले. याविषयी कोल्हापूरमधील मनीषा शिंदे व पुणे येथील सनाथ संस्थेच्या गायत्री पाठक यांनी या विद्यार्थ्यांबाबत दीपस्तंभ फाउंडेशनला कळविले. त्यावेळी त्यांना दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे तीन दिवसांपूर्वीच किराणा साहित्य व इतर मदत करण्यात आली. दीपस्तंभ परिवारातील सदस्य राजेश झोलदेव (दिल्ली), एरंडे, संदीप काटे (सातारा), डॉ. राजेश डाबी यांनी यासाठी योगदान दिले.

मदतीसाठी हात मोकळे

उपक्रमासंदर्भात अधिक माहिती संस्थेच्या वेबसाइटवर दिली आहे. लॉकडाऊनमध्ये अपंग, अनाथ विद्यार्थ्यांना कुठलेही अत्यावश्यक सहकार्य लागल्यास तसेच ज्या व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होऊन अनाथ , अपंग विद्यार्थ्यांना मदत करावयाची असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो - लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कोल्हापूर येथील अनाथ विद्यार्थ्यांना जळगावातील दीपस्तंभ मनोबल केंद्रातर्फे किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी उपस्थित मनीषा शिंदे.