पिलखोड, ता. चाळीसगाव : मनोहर बाविस्कर यांचा कोरोना लाॅकडाऊनच्या काळात सुटीचा सदुपयोग व्हावा, म्हणून संपूर्ण जगातील ११२ देशामधील नामवंत कलाकारांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित करून एकूण ११४९ चित्रे (पेटिंग) साकारली. ही चित्रे एका तासात फेसबुकवर अपलोड करावयाची होती. त्यात पिलखोडचे मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे राहत असलेल्या मनोहर बाविस्कर यांनी कोरोना विघ्न दूर व्हावे, म्हणून विघ्नहर्ता गणपती बाप्पा या विषयावर दहा तासात १२५० गणपतीची विविध चित्रे तयार केली होती.
अनेक कलावंताचा यात सहभाग होता. यांच्या चित्रांची निवड थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा मुंबईतील शिक्षकांचा सन्मान आहेच, त्या बरोबरच महाराष्ट्राचा गौरव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक त्यांना बहाल करण्यात आले. प्रगती विद्यालय गोराई बोरिवली या ठिकाणी बाविस्कर सर कार्यरत आहेत... विद्यार्थ्यांना सतत कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते सतत पुढाकार घेत असतात.