शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भुसावळातील उद्योगपती मनोज बियाणींना ९० लाखांत फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 8:40 PM

अकोल्यातील उद्योगपती विवेक पारस्करसह ब्रोकर उमेश राठीविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देशेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन विकण्याचा प्रयत्न२०१५ साली झाला होता व्यवहारखरेदी करण्यास टाळाटाळमुळे प्रकार झाला उघड

भुसावळ, जि.जळगाव : शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा नगरसेवक मनोज बियाणी यांना ९० लाख रुपयांत फसवल्याची घटना घडली. या प्रकरणी अकोला येथील उद्योगपती तथा संशयित आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैयालाल राठी (साई सदन, रणपिसे नगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.भुसावळ तालुक्यातील खडका येथे शेतजमीन गट क्रमांक १६८/१६९ चे कागदपत्र तयार करून २६ लाख एक हजार रुपये किमतीत सौदा करून ईसार पावतीवर खरेदी करून देण्याचा प्रयत्न आरोपी पारसकर व ब्रोकर राठी यांनी केला. हा व्यवहार २०१५ साली करण्यात आला होता. यावेळी बियाणी यांनी संशयित आरोपींंना पैसे दिले होते. मात्र संशयित दोन्ही आरोपी खरेदीसाठी येत नव्हते. त्यामुळे बियाणी यांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली, मात्र खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे बियाणी यांचा संशय बळावला.फसवणूक अशी झाली उघडसंशयित जमीन आपल्या नावावर करून देत नसल्याने आपला संशय बळावल्यानंतर २७ जुलै बियाणी यांनी खडका तलाठी कार्यालयात जावून शेत गट क्रमांक १६८-१६९ यांचे उतारे मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर सर्वे नंबर १ ते १३७ असल्याचा दाखला मिळाला व त्यावेळी शेतजमीन सर्वे क्रमांक १६८ ही अस्तित्वात नसताना बनावट उताऱ्यावर कागदपत्रे बनवून ती असित्वात असल्याचे दाखवून आपली आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या ईसाºया पावतीपोटी ९० लाखांची रक्कम हडपली.संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकीबियाणी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने माझ्यावर सिव्हिल लाईन, अकोल्यात पाच गुन्हे दाखल आहेत, माझ्याकडे गुंड लोक आहेत, तुमच्या कुटुंबाला संपवू, अशी धमकीदेखील दिल्याचे बियाणी यांनी तक्रारीत नमूद केले असून, पोलीस माझे करू शकत नाही, असेही आरोपींनी म्हटल्याचे नमूद आहे. तपास पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास पवार करीत आह. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ