जळगाव - महानगरपालिकातर्फे जळगाव रत्न पुरस्कार जाहीर केले गेले आहे. या पुरस्काराचे निकष जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, पुरस्कार प्रेरणा देतात, पण मनपाद्वारे नुकतेच जळगाव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून मनपाने नागरिकांची दिशाभूल केली आहे. बहुजन समाजासाठी सामाजिक कार्य करणा-या योग्य व्यक्तींना डावलून सदरचा पुरस्कार जाहीर करून बहुजन समाजासाठी सेवा करणा-या समाजसेवकांची अवहेलना केली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तर पुरस्कारासाठी सर्व प्रथम प्रस्ताव मागवून जनसामान्यांचा कौल जाणून पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. निवेदनावर विशाल शर्मा, मयुर बारी, विवेक महाजन, प्रदीप सोनार, मधुकर माळी, रोहित शर्मा, अमित अग्रवाल, कुलदिप बुआ, नीलेश वाणी, सुमित चौधरी, पदमाकर जैन, चंद्रकांत पाटील, भिकन महाजन आदींच्या स्वाक्ष-या आहेत.