यासंदर्भात आज २३ रोजी चहुत्रे गावाला सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाची तयारी केली होती. त्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, विभागीय अध्यक्ष जितेंद्र एम. वानखेडे, महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील, भीम आर्मीचे भाऊसाहेब सोनवणे यांनी चहुत्रे गावाला भेट दिली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून धारागीर धरण येथे विहीर मंजूर करून तेथून पाईपलाईन आणि बाहूटे धरणाच्या जवळील विहिरीचे पाणी गावात उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. प्रशासनाने ठोस आश्वासन दिल्यानंतर हंडा मोर्चा आंदोलन मागे घेण्यात आले.
छाया---
चहुत्रे ता. पारोळा येथे पिण्याच्या पाण्यासाठी नारीशक्ती एकवटली.
२३/ १२