जळगाव : मनपाच्या नगररचना विभागाने १० भूसंपादनाचे प्रस्ताव महासभेची परवानगी न घेताच पाठविल्यात सुनील महाजनांच्या आरोपात तथ्य असून, मनपात भूसंपादनाचे व्यवहार करण्यासाठी टोळी सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती उपमहापौर डॉ.अश्निन सोनवणे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणावर शुक्रवारी उपमहापौर सोनवणे यांनी नगररचना विभागाकडून या प्रकरणांची माहिती घेतली आहे.नगररचना विभागाने गेल्या दिड वर्षात १० भूसंपादनाचे विषय महासभेला न सांगताच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला होता.याबाबत शुक्रवारी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी नगररचना विभागातील अभियंता शकील शेख यांना आपल्या दालनात बोलावून घेत. या दहा प्रस्तावांची माहिती घेतली.तसेच हे सर्व दहा प्रस्ताव महासभेची परवानगी न घेताच पाठविल्याचे आढळून आले. त्यानंतर उपमहापौरांनी याबाबत दहा प्रस्तावांतील जमिनींची जागा, त्या जागा भूसंपादित करण्यासाठी लागणारी खर्चाची तरतूद याबाबतची माहिती घेतली.भूसंपादनाच्या प्रकरणात जर मनपाला आर्थिक नुकसान होत असेल तर हे प्रस्ताव महासभेकडून फेटाळले जातील अशी माहिती उपमहापौरांनी पत्रकारांशी बोलताना दिली.४गेल्या महिन्यात देखील महासभेसमोर मांडलेल्या भूसंपादनाच्या प्रस्तावात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचा प्रस्ताव फेटाळला होता.४मात्र, एवढे असूनही मनपाने पुन्हा १० प्रस्ताव महासभेला साधी विचारणाही न करता पाठविल्यामुळे भूसंपादनात मोठा घोळ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जी टोळी सक्रीय आहे. त्या टोळीचा पर्दाफाश लवकरच करण्यात येईल.४यासाठी लवकरच चौकशी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिली.
भूसंपादनासाठी मनपात ‘टोळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:11 AM
उपमहापौरांची धक्कादायक माहिती
ठळक मुद्दे० प्रस्तावांची माहिती मागविली‘त्या’ टोळीचा पर्दाफाश करू