जळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील तब्बल ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २४, भुसावळ ८, अमळनेर ३, चोपडा ६, पाचोरा १, धरणगाव १, यावल ४, एरंडोल १ तसेच जामनेर २, जळगाव ग्रामीण २, रावेर ४, पारोळा ८, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ५ तर दुसऱ्या जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८७१ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात तब्बल ७१ बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आढळले तब्बल ७१ कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:56 PM