- विलास झवर
पाळधी (जि.जळगाव) : पाळधी (ता.धरणगाव ) येथील डॉ, व्ही. आर. पाटील (८०) यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाणनजीक तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली, आपली चारचाकी गाडी पुलावर लावून त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतली.
डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली. त्यामुळे आता जीवन चांगल्या प्रकारे जगल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
पुरोगामी चळवळीत सक्रीय असलेल्या डॉ. पाटील यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला होता.