रावेर, जि.जळगाव : माओवाद व नक्षवाद हे एकच असून आपण आदिवासींचे हितचिंतक असल्याचा भास ही मंडळी निर्माण करते. माओवाद हा गडचिरोली वा छत्तीगडपर्यंत मर्यादित नाही. तो आता पुण्यासारख्या प्रगत शहरापर्यंत येऊन ठेपला असून, तो धोकादायक ठरत असल्याची माहिती कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी शनिवारी येथे ‘शहरी माओवाद’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना दिली.रावेर येथील रंगपंचमी व्याख्यानमालेच्या यंदाचे ‘शहरी माओवाद’ या विषयावर व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिवलाल अग्रवाल रंगमंचावर प्रारंभी व्याख्यात्या कॅप्टन स्मिता गायकवाड, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रा.प्रकाश मुजूमदार, विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष विठोबा पाटील, हेमेंद्र नगरीया यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक विश्वस्त डॉ. राजेंद्र आठवले यांनी केले.कॅप्टन गायकवाड पुढे म्हणाल्या, संतोष शेलार हा पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादाच्या छत्तीसगडमध्ये संघनायक म्हणून काम पाहतो. म्हणून माओवाद गडचिरोली वा छत्तीसगड पुरता मर्यादित नसून पुण्यासारख्या पुढारलेल्या प्रगत शहरातही जोपासला जात आहे.माओवादी हे आदिवासींचे हितचिंतक आहेत, असा भास निर्माण केला जातो. माओवाद आणि नक्षलवाद हे एकच आहेत. शहरी माओवाद हा कोरेगाव भीमा प्रकरणापासून नव्हे तर भारतात सन १९७० पासून अस्तित्वात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत तेंदू पत्त्याला चांगले भाव मिळवून देण्याच्या निमित्ताने माओवादींनी आपले पाय रोवले. मन जिंकून नव्हे तर शस्त्राच्या बळावर पाय रोवण्याचा येथे प्रयत्न झाला.माओवाद संपुष्टात आणण्यासाठी भारतीय सैन्याला आता दंडकारण्यात क्रांतीकारी तळ उभारावे लागतील. दंडकारण्यामध्ये माओवादांनी असे तळ उभारले आहेत . जनतेसाठी शेती, राजकीय सत्ता व सैन्य दल उभारणे अशी त्यांची रणनीती आहे. संसदीय लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. बंदुकीच्या टोकावर सत्ता स्थापन करण्यावर त्यांचा विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या.----आजचे व्याख्यानव्याख्याते - मेजर जनरल शिशिर महाजनविषय - जम्मू आणि काश्मीर : काल, आज आणि उद्यावेळ - सायंकाळी ६.३० वाजता
माओवाद शहरांपर्यंत पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:52 PM
माओवाद व नक्षवाद हे एकच असून आपण आदिवासींचे हितचिंतक असल्याचा भास ही मंडळी निर्माण करते. माओवाद हा गडचिरोली वा छत्तीगडपर्यंत मर्यादित नाही. तो आता पुण्यासारख्या प्रगत शहरापर्यंत येऊन ठेपला असून, तो धोकादायक ठरत असल्याची माहिती कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी दिली.
ठळक मुद्देकॅप्टन स्मिता गायकवाडरंगपंचमी व्याख्यानमालेस प्रारंभ