शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:09 PM

साधेपणाने होणार सोहळा

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चिततानामविस्तार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ अशा नामविस्तार सोहळ्यावर मराठा समाजाचे आंदोलन व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट असल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा अनिश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यास नामविस्तार सोहळा साधेपणाने साजरा केला जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्ताराचे विधेयक काही दिवसांपूर्वी विधानसभेत मंजुर करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा सोहळा ११ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंत्रालयाकडून अध्यादेश प्राप्त झालेले नसले तरी विद्यापीठाने सोहळ्याची तयारी सुरु केली आहे.सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नामविस्ताराचा कार्यक्रम होणार आहे. मात्र सध्या मराठा आरक्षणावरून राज्यभर आंदोलन सुरु आहेत. त्यातच राज्य सरकारी कर्मचाºयांनी सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यापाठोपाठ धनगर व धोबी समाजाने देखील आरक्षणाची मागणी आहे. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे येणे अनिश्चित आहे....तर सोहळा साधेपणाने होणारमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द झाल्यास विद्यापीठ नामविस्तार सोहळा हा साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ११ आॅगस्ट रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नामफलक लावण्यात येणार आहे. मुख्य सोहळा मुख्यमंत्र्यांची वेळ उपलब्ध झाल्यानंतर घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.नामविस्तार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यातमंत्रालयाकडून विद्यापीठाला अधिसूचना प्राप्त झालेली नसली तरी नामविस्तार सोहळ्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे. मुख्य प्रवेशद्वाराला रंग देण्याचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी दुपारी किंवा मध्यरात्री या प्रवेशद्वारावर नाव टाकले जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी कोनशीला तयार करण्याचे काम सुरु आहे. मुख्य इमारतीवर असलेल्या लोखंडी गेटला देखील रंगरंगोटी करण्यात येत आहे. पदवीप्रदान सभागृहाची साफसफाई देखील करण्यात येत आहे. सोहळ्यासाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांकडून रोज कामाचा आढावा घेतला जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव