मुक्ताईनगर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारी ३ तारखेपासून सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिला पेपर असतांना कुºहा ता. मुक्ताईनगर येथे अवघ्या १५ मिनिटातच मराठीची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपवर फिरू लागली. यामुळे एकच खळबळ उडाली.पहिल्याच पेपरला अवघ्या १५ मिनिटात पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार व्हाट्सअपच्या माध्यमातून दिसून आला असतांना खºया अर्थाने अवघ्या २० व्या मिनिटाला हे पेपर फुटीचे बिंग फुटले ते या गावातील काही झेरॉक्स सेंटरवरवर. या ठिकाणी उत्तरांची कॉपी झेरॉक्स करण्यासाठी आल्यामुळे कुºहा येथे हा प्रकार घडल्याने पेपर फुटल्याचा प्रकार नेमका कुºहा परीक्षा केंद्रावरून विदयार्थ्यांने व्हाट्सअप वर टाकला की अन्य ठिकाणा झालाहा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआल आहे.
१० वीचा मराठीचा पेपर १५ व्या मिनिटात फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 2:25 PM