जळगाव : मुलीला किराणा दुकानावर पाठवून सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेने शिरसोली प्र.न.येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजता घडली. घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोनल माळी यांनी मुलगी प्राची हिला किराणा दुकानावर पाठविले. त्यानंतर राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी थोड्यावेळाने परत आली तेव्हा दरवाजाची कडी आतून बंद होती. आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्राची हिने शेजारील महिलांना सांगितले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता सोनल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
शिरसोली येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 8:00 PM
मुलीला किराणा दुकानावर पाठवून सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेने शिरसोली प्र.न.येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजता घडली.
ठळक मुद्देशिरसोली येथील राहत्या घरात घेतला गळफासमुलीला किराणा दुकानावर पाठविले अन् जीवनयात्रा संपविलीजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित