ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - राज्य सरकारतर्फे केल्या जाणा:या माथाडी कामगार कायद्यातील फेरबदलाच्या नावाखाली माथाडी कायदा गुंडाळण्याचा प्रय} होत आहे. या विरोधात जळगावसह जिल्हाभरात बाजार समित्या बंद ठेवून जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेच्यावतीने सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येऊन जवळपास 40 लाख रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा संघटनेचे जिल्हाचिटणीस शरद चौधरी यांनी केला आहे.
बाजार समित्यांमध्ये शुकशुकाटराज्य सरकार राज्यातील 36 माथाडी मंडळ बरखास्त करून एकच माथाडी मंडळ तयार करण्याची तयारी करीत असून या विरोधात संघटनेचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. यात शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, दाणा बाजार व ट्रान्सपोर्ट नगरातील सुमारे आठशे हमाल मापाडी सहभागी झाले होते. या एक दिवसीय बंद मुळे सर्व हमाल व मापाडी यांचा रोजगार तर बुडालाच त्यासोबतच दिवसभरात होणारी जवळपास 40 लाख रुपयांची उलाढालदेखील ठप्प झाली.
जिल्हा प्रशासनास निवेदन जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, दाणाबाजार, ट्रान्सपोर्ट, मेरिको कंपनी, बाजार समिती, ट्रान्सपोर्ट नगर येथील कामकाज बंद ठेवत माथाडी मंडळ विलीनीकरण रद्द करावा या मागणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, जिल्हाचिटणीस शरद चौधरी, भागवत हिरवाळे, तुकाराम गर्जे, शेख गफूर, सुकदेव शेळके, डिगंबर सावदे, भगवान सोनवणे, मोहन सोनार, बन्सी खरात, विश्वनाथ बोरुडे, किसन सोनवणे, नथ्थू गायकवाड, अशोक खोंडे, विष्णू पवने, भाऊसाहेब वामन, सुकदेव बांदल, प्रकाश खैरे, महेंद्र वाणी उपस्थित होते.