कोरोना लाट ओसरल्यामुळे व रुग्णांची संख्या अत्यल्प असल्यामुळे फक्त गणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे, गुरुवारी संध्याकाळी बाजारपेठेत पूजेसाठी लागणारे पाच फळे ,केळीचे खांब, दुर्वा, फुलहार ,सजावटीचे सामान खरेदी करताना बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश यांची मूर्ती विक्रीसाठी दिसून येत आहे. यात लोकमान्य टिळक यांचा पेहराव असलेली, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिकृती तसेच भगवान मल्हारी मार्तंडाच्या मूर्तीप्रमाणे पगडी परिधान केलेला गणपती आदी विविध रुपातील गणपती मूर्तीही बाजारात विक्रीस आल्या आहेत. दहा हजारापर्यंत मूर्तींची आकार प्रमाणे किंमत आहे. अमरावती, बऱ्हाणपूर येथील आलेल्या शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी होत आहे.
बाजारात कोट्यवधींची उलाढाल
गेल्या काही दिवसापासून समाधानकारक पाऊस व कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद दिसून येत आहे. यामुळे बाजारात पूर्वीप्रमाणे ग्राहकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे . यातून बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे.