जळगाव : अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर आता बाजारपेठ हळूहळू आर्थिकदृष्ट्या सावरू लागली आहे. सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी पहिल्यांदाच ठिकठिकाणी अनेक दुकाने उघडली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.सोमवारपासून ‘अनलॉक’चा तिसरा टप्पा सुरु झाला. या महत्वाच्या टप्प्यात अनेक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. केवळ हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच सलून, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मॉल्स या परवानगीतून वगळण्यात आली आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व कामे करण्यास तसेच देखभाल दुरुस्तीसाठी सर्व दुकाने उघडण्यास काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक व्यापाºयांनी देखभाल दुरुस्ती करून घेतली आहे. पहिल्याच दिवशी अन् मंगळवारीही पूर्वीप्रमाणेच बाजारपेठ गजबजून गेली आहे.साठवणुकीच्या कांद्याची विक्री अंतिम टप्प्यातलॉकडाऊनच्या काळातच शेतकºयांनी महामार्गाशेजारी तसेच घरोघरी साठवणुकीच्या कांद्याची विक्री केल्याने आता ही विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या कांदा १२ ते १५ रूपये किलो या दराने घाऊक दरात उपलब्ध आहे.सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी सुरुचसोना-चांदीचे दर गगनाला भिडले असले तरीही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. ही दालने अनलॉकच्या दुसºयाच टप्प्यात उघडली आहेत.बाजारपेठ सुरु झाली ही स्वागतार्ह बाब आहे. मध्यंतरी सणासुदीचा बराच काळ निघून गेल्याने व्यापाºयांकडे मालही शिल्लक आहे. सर्व काही सुरळीत होण्यासाठी अजून १५ दिवस लागतील. शहरातील व्यापारी संकुलातील दुकाने सुरु होणे गरजेचे आहे.- विजय काबरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव.
लॉकडाउनमधून बाजारपेठ सावरतेय.!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:56 AM