चाळीसगावात पहिल्याच दिवशी गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी
चाळीसगाव : शहरात निर्बंध शिथिल होताच कोरोना संसर्गाची भीती बाजूला सारत बेफाम चाळीसगावकरांनी नियम पायदळी तुडवत पहिल्याच दिवशी सोमवारी बाजारात गर्दी केली. विविध ठिकाणी सायंकाळपर्यंत वर्दळ दिसली. विशेष बाब म्हणजे, निर्बंध झुगारून व्यवसायावर भर देणाऱ्या विक्रेत्यांसह ग्राहकांना कोरोना संसर्गाची तसूभरही भीती वाटली नाही. स्टेशनरोड, तहसील कार्यालय परिसर, घाटरोड, बाजारपेठ, गणेशरोड, भडगावरोड, हिरापूररोड, बसस्थानक परिसर आदी भागात सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली. या गर्दीवर नियंत्रण आणण्यात प्रशासन पहिल्या दिवशीच अपयशी ठरले. ग्राहकांसह विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवत व्यवहारांची घडी बसविण्यावर भर दिला. यामुळे सुरक्षित वावरासह सॅनिटायझेशनचे नियम पाळण्यात आले नाहीत. अनलॉक असल्यामुळे सर्व काही आलबेल अशा पद्धतीने सर्वत्र चित्र शहरात पहायला मिळाले. एकाने नियम झुगारले, तरी दुसऱ्यांनी त्याला दुजोरा दिल्याने चिंता वाढली आहे. चाळीसगावकर सतत बेपर्वाईने वागत असल्यानेच जिल्ह्यात सर्वात जास्त दररोज कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत आहे.
पहिल्याच दिवशी गर्दी
धरणगाव: गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने शहरातील बाजारपेठेतील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी अकरापर्यंतच सुरू राहत होती. त्यामुळे लोकांना खरेदी करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. लोक या अव्यवस्थेला कंटाळून गेले होते. त्रासून गेलेले छोटे व्यापारी तसेच साहित्याचे दुकान सोडून उर्वरित दुकानदार या परिस्थितीला कंटाळून रोजीरोटी गमावून बसले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी संपूर्ण जिल्हा अनलॉक घोषित केला. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाजारात उपस्थित दिसले. प्रशासनाने मात्र सर्व नियमांचे पालन करूनच वावरावे असा सावधगिरीचा इशारा दिला आहे. तसेच दुकानदारांनी सुद्धा त्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
अमळनेरातही गर्दी
अमळनेर शहरातही अनलाॅकनंतर एकच गर्दी उसळली. पहिल्याच दिवशी कैरी बाजार भरला होता. कैरी खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. आता दिवसभर दुकाने सुरु असल्यामुळे कापड दुकाने, तसेच अन्य दुकानांवरही नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
===Photopath===
070621\07jal_15_07062021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव शहरातील गणेशरोडवर अशा प्रकारे सोमवारी दुकानदार व नागरीकांनी गर्दी केल्यामुळे रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते.