आॅनलाईन लोकमत जळगाव,दि.२८- कृउबाची मार्केट फीची थकबाकी असताना व कृउबाने वारंवार नोटीस बजावूनही दप्तर तपासणीसाठी न देणाºया दाणाबाजारातील तीन व्यापाºयांचे दप्तर जप्तीची कारवाई कृउबाच्या पथकाकडून गुरूवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. याबाबत कृउबाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाणाबाजारात विपुल एन्टरप्रायजेस या दुकानातच चंपकलाल नानाभाई तसेच भार्गव एजन्सी या नावाने लायन्सेस व्यापारी आहेत. या तिन्ही व्यापाºयांनी १ एप्रिल २०१६ पासून मार्केट फी दिलेली नाही. त्यामुळे मार्केट कमिटीने १५ जुलै २०१७ रोजी महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) नियम १९६७ मधील नियम २०(३) अन्वये या तिन्ही फर्मच्या १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या मुदतीतील जाहीर केलेल्या शेतीमालाची खरेदी-विक्री संबंधीत असलेली हिशेबाचे दप्तर तपासणीसाठी देण्याची मागणी केली होती. मात्र या व्यापाºयांकडून दप्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे दि.२८ सप्टेंबर, गुरूवारी सकाळी ११ वाजता कृउबाचे सचिव आर.डी.नारखेडे, रोखपाल कैलास शिंदे यांच्यासह कर्मचाºयांचे पथक पोलीस बंदोबस्तात दाणाबाजारात दाखल झाले. तेथे दप्तराची मागणी केली. मात्र अनेक कागदपत्र आॅडीटसाठी दिलेली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपलब्ध रेकॉर्ड जप्त करण्यात आले. शहरातील इतरही व्यापाºयांकडून मार्केट फी वसुल करण्यासाठी दप्तर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दाणाबाजारातील तीन व्यापाºयांचे दप्तर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 2:15 PM
कृउबाची कारवाई: मार्केट फी थकीत असूनही दप्तर तपासणीस देण्यास टाळाटाळ
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात केली कारवाईआणखी काही व्यापाºयांवर करणार कारवाई