अमळनेर : माहेरून ५० हजार रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, सासू व इतर ५ जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेरंजिता दीपक सपकाळे (वय ३२, रा. प्रताप मिल कम्पाउंड अमळनेर) यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये यासाठी तिचा पती दीपक रमेश सपकाळे, सासू इंदूबाई रमेश सपकाळे, दीर प्रवीण रमेश सपकाळे, जाऊ पूनम प्रविण सपकाळे, नणंद नलिनी संजय अहिरे, सविता सैंदाने, कविता संदीप कांबळे हे शारीरिक व मानसिक छळ करीत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून फियार्दीने माहेरून ५० हजार रुपये आणून सासरच्यांना दिले. त्यांनरत २ महिने वागणूक सुधारली परंतु फियार्दीची नणंद कविता कांबळे ही अधून मधून माहेरी येऊन घरात भांडण लावून हिला मुलबाळ होत नाही असे सांगत फियार्दीला शिवीगाळ व छळ करून परत ५० हजार रुपयांची मागणी करीत होते.या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०७, ४९ (अ), ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.
५० हजार रुपयांसाठी अमळनेर येथील विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:04 AM