शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कुंकवातच दडते जेव्हा वेदना वैधव्याची!, पारोळ्यातील पाटील कुटुंबात एकाच दिवशी लग्न आणि विघ्नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:57 PM

वहिनीच्या कर्तव्य वहनाचा करुणवेद

ठळक मुद्देदीर-दिराणी आता संसाराच्या वाटेवर निघाले माऊलीने स्वत:च्या दु:खाला दिली वाट करून

- कुंदन पाटील 

जळगाव - इस्पितळात स्वत:चं कुंकू मृत्यूशी झुंज देत होतं आणि घरावर दिराच्या लग्नाचे तोरण बांधले गेले होते... लहान भावाच्या लग्नात मोठ्या भावाची क्षणाक्षणाला उणीव भासत होती. अर्धांगिनी म्हणून अर्धी का होईना ही उणीव भरून काढण्याची जबाबदारी तिच्यावर होती. हृदयातील अतीव दु:खावर कर्तव्याचा पदर झाकत ती मंडपात आली आणि दिराला धीर दिला. आशीर्वाद दिला. मंगलाष्टक झाले...अक्षता पडल्या... एव्हाना अमंगळ बातमी आली होती... पण दिराणीचा कुंकूम सोहळा आटोपल्यावर तिने आपल्या कपाळावरचे कुंकू पुसले... तोवर स्वत:चे दु:ख तिने विनाकारण कपाळावर असलेल्या कुंकवातच जणू दडवून, दडपून टाकलेले होते...देवाब्राह्मणांची साक्ष झालेली आहे अन् या साक्षीने दीर-दिराणी आता संसाराच्या वाटेवर निघाले आहेत, त्याची साक्ष पटल्यावर मग या माऊलीने स्वत:च्या दु:खाला वाट करून दिली.

योगिता रोशन पाटील (वय २९) हिच्या विशाल हृदयाची ही व्यथा. नियतीने ही कथा पारोळा, जळगाव, बेटावदला लिहिली.पारोळ्यातील किसान महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी आप्पासाहेब भास्करराव पाटील यांच्या कुटुंबात घडलेली... खरं तर या कुटुंबावर बेतलेली... ही दु:खद कथा... पाटील यांचा मुलगा राहुल याचा दि. ६ मे रोजी विवाह ठरला. घरात तिसरी सून येणार म्हणून तिथला उंबरठाही आनंदक्षणांनी सजला.

लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच ३ मे रोजी मध्यरात्री दुचाकीवरून येणारा पाटील यांचा मोठा मुलगा रोशन (वय ३४) याच्या दुचाकीला व्हॅनने धडक दिली. त्यात त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला. जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोशनचा पाय कापण्याची वेळ आली. तेव्हा त्याचे वडील आप्पासाहेबांनी ज्येष्ठ सून योगिता यांना तातडीने बोलावून घेतले. सून योगिताला त्यांनी पाय कापण्यासंदर्भात माहिती दिली. योगितानेही परिस्थिती पाहून पाय कापण्यास होकार दिला. तशातच रोशनची प्रकृती गंभीर झाली. उपचार यंत्रणेचाही नाईलाज झाला. तेव्हा आप्पासाहेब पाटील यांनी योगिताला लग्नसोहळ्याचे काय करायचे म्हणून विचारले. मग तिच्या मायेचा झरा पाझरला. ती म्हटली, ‘ते’ (रोशन) लग्नसोहळ्यात नसतील. पण मी त्यांची उणीव भासू देणार नाही. कुणाचीही गैरसोय होऊ देणार नाही. मी घरातली मोठी सून. राहुल यांची मोठी वहिनी. भाऊ आणि मोठी वहिनी म्हणून मी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडेल.

खरंतर ती सारं दु:ख उरात दडपून होती. ती तशीच जळगावहून पारोळ्याला आली. घरी पोहोचली. नवरदेवासह वºहाडींची तयारी पूर्ण केली. चिमुरड्या लेकराला खांद्यावर घेत उपवर दीर राहुलसह तिने लग्नसोहळ्याचे गाव (बेटावद, ता. शिंदखेडा) गाठले.तिथल्या हळदीच्या कार्यक्रमाला योगिताने मोठ्या वहिनीच्या रूपानं ममत्वाचा रंग दिला. तेव्हा दु:खाची साधी छटाही तिने जाणवू दिली नाही. हळदी सोहळ्यातील प्रत्येक गोडवा तिने जिवंत ठेवला. अगदी हळदीसारखाच गुणकारी...!!!

लग्नसोहळ्याचा दिवस उजाडला. ती रविवारची पहाट. सूर्य उगवला तो रोशनच्या मृत्यूची बातमी घेऊन. रोशनच्या मृत्यूची बातमी आप्पासाहेब आणि राहुलपर्यंतच पोहोचली होती. आप्पासाहेब तसे धीट मनाचे आणि परखड स्वभावाचे. तेवढेच लढवय्या स्वभावाचे. आप्पासाहेबांनीही छातीवर दगड ठेवत ती बातमी मनात दडवली. राहुलही हळदीच्या अंगाने दु:ख आतल्याआत पचवत गेला. दोघांनीही मनातलं दु:ख अडवण्यासाठी कठोरतेचा बांध बांधला. अवघडलेल्या बापबेट्यांनी मनाला कठोरतेचे कुंपण घातले आणि ती ‘अमंगल’ बातमी ‘मंगल’ सोहळ्यापासून दूर ठेवली.. तिकडे सासरे आणि दिराच्या चेहºयावरचे लपणारे दु:ख योगिता जाणत होती. पण तिला नवदाम्पत्याची काळजीही सतावत होती. तशातच विवाह सोहळ्यात आमदार डॉ.सतीश पाटील आले. तेव्हा त्यांनी मंडपाबाहेरच आप्पासाहेबांना मिठी मारली. खरंतर आमदारांची गळाभेट धीर देणारी होती. कारण त्यांना रोशनच्या मृत्यूची बातमी माहिती होती. आप्पासाहेबांनी त्यांच्या धीरदायी गळाभेटीला सहनशीलतेची किनार दिली. कारण दु:खाचा बांध फुटू द्यायचा नव्हता. म्हणून तेव्हा आप्पासाहेब आमदारांना म्हटले, माझा रोशन लग्न पाहतोय. त्याला काहीच होणार नाही. तो येईल परत.मंडपात वºहाडींच्या पंगतीही सुरू होत्या. वाजंत्रीही निनादत होती. राहुल आणि वेदिका मंडपात आले आणि विवाहबद्ध झाले.नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यायला गेलेल्या आप्पासाहेबांनी सपत्निक मंच गाठला. राकेशला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. क्षणातच योगिताही आसवात बुडाली. मंगल सोहळ्यातला सारा माहोल बदलला होता.आप्पासाहेबांच्या पत्नी मात्र अंधारातच होत्या. काय घडतयं, याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. तेव्हा त्याच म्हटल्या, चला, जळगावला जाऊ या. रोशनजवळ थांबू या.तेव्हा आप्पासाहेबांनी त्यांनाही अंधारवाटेवर नेले. नवी सून घरी येतेय, तिचं स्वागत करूनच आपण जळगाव जाऊ, असे सांगत ती दुर्दैवी बातमी दडवली.

नवदाम्पत्यासह सारे वºहाड परतीला निघाले. आनंदाचे जोडे विवाहस्थळी मंडपातच काढूनच...!!!

राहुलने हळदीच्या सोहळ्यात धोतर नेसावं, असं नियोजन रोशनने केले होते. त्यासाठी धोतरजोडाही आणून ठेवला होता.रोशनची ही इच्छाही योगिताने पूर्ण केली. तिने स्वत:च्या हातून दीराला धोतर नेसवले. झब्बा घातला तेव्हा क्षणाक्षणाला रोशन आठवत होता.नशिबाने केलेली ही थट्टाच. दु:ख विसरता येणार नाही. आम्हाला लेक नाही. पण सुनाही लेकीपेक्षा कमी नाहीत. संकटाशी सामना करणाºया योगितापुढे नियतीही शरमेने झुकली असेल.-आप्पासाहेब पाटील, मयत रोशनचे वडील

टॅग्स :ParolaपारोळाJalgaonजळगाव