जळगाव : दोन मुली झाल्या तरी मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांकडून होणारा छळ असह्य झाल्याने बबिता कांतीलाल पवार (वय २३) या विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता आदीत्य कॉलनीत घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील रहिवाशी कांतीलाल एकनाथ पवार हे शहरातील आदित्य नगरात आई विमलबाई, वडील एकनाथ धुडकू पवार व भाऊ शांतीलाल यांच्यासोबत वास्तव्याला आहे. ३१ मे २०१४ रोजी सोनगीर पाडा, ता.नंदूरबार येथे त्याचा बबिता हिच्याशी विवाह झाला. लग्नानंतर दोन वर्षांनी एक मुलगी तर दहा महिन्यापूर्वी एक अशा दोन मुली झाल्या. मुलगा होत नसल्याने पती, सासू, सासरे व दीर यांच्याकडून सतत छळ होत होता. त्रास असह्य झाल्याने बबिता हिने बुधवारी सकाळी चार वाजता राहत्या घरात गळफास घेतला. गळफास घेतल्यानंतर पत्नीच्या पायांचा स्पर्श झाल्याने कांतिलाल याला जाग आली तेव्हा ही घटना उघडकीस आली.मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वडील व माहेरच्या लोकांनी जळगावला धाव घेतली. घरी आल्यावर संतापात पतीला मारहाण केली. हा प्रकार समजल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, जितेंद्र पाटील व मगन मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सासरच्या लोकांना लागलीच ताब्यात घेतले. दरम्यान, पतीनेच मुलीला अग्निडाग द्यावा अशी मागणी पित्याने केल्याने मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत बबितावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेत सासू वगळता पती, दीर व सासरा यांना अटक करण्यात आली आहे.
मुलगा होत नसल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून जळगावात विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:49 PM
दोन मुली झाल्या तरी मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांकडून होणारा छळ असह्य झाल्याने बबिता कांतीलाल पवार (वय २३) या विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता आदीत्य कॉलनीत घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देजळगाव शहरातील आदीत्य नगरातील घटनापोलिसांनी केली तीन जणांना अटकपोलीस बंदोबस्तात केले अंत्यसंस्कार