महेश कौंडिण्य ।पाचोरा, जि.जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळच स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण करणारे हुतात्मा स्मारक दिमाखात पाचोरा शहराचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाचे साक्ष देत आहे.या शहरातून २६ आॅगस्ट १९४२ रोजी हुतात्मा शहादू चिंतामण बेंडाळे आणि हुतात्मा छगन राजाराम लोहार यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर झेलत स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले.स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब सुपडू भादू पाटील यांनी मुंबई अधिवेशनानंतर परत येत असतानाच स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार आणि प्रसार करायला पाचोरा तालुक्यातील छोट्या छोट्या गावात सुरुवात केलेली होती भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि २६ आॅगस्ट १९४२ सुपडू भादू पाटील यांची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली आणि पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असेल गांधी चौक या भागात या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. ही बातमी कळताच पिंपळगावचे फौजदार पेठेकर आनंदित होऊन मामलेदार व काही पोलिसांसह सभास्थळी आले. त्यांनी सुपडू भादू पाटील यांना अटक करण्याचा प्रयत्न करताच दोन हजाराचा समुदाय पेटून उठला आणि एकच संघर्षपूर्ण याच संघर्षात हुतात्मा छगन राजाराम लोहार यांच्या मानेखाली पोलिसांच्या बंदुकीची गोळी घुसली. त्यामुळे ते जागीच धारातीर्थी कोसळले तर हुतात्मा माळी शहादु चिंतामण हे पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी होते. ते भारत वनस्पती कारखाना पाचोरा येथे कामगार होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंदुकीची गोळी त्यांच्या छातीत घुसून बाहेर निघाली होती आणि ते गांधी चौकात धारातीर्थी कोसळले. या संघर्षात सात स्वातंत्र्यसैनिक देखील गंभीर झाली पाचोरा तालुक्यात स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मोठ्या गवार्ने आणि अभिमानाने उराशी बाळगलेल्या असून आजही गांधी चौकात असलेल्या हुतात्मा स्तंभ असेल किंवा शिवाजी चौकात असलेले हुतात्मा स्मारक असेल तरुणांच्या मनात देशाभिमानाचे उर्मी जागवल्याशिवाय राहत नाही.
राष्ट्राभिमान जागृत करणारे पाचोऱ्याचे हुतात्मा स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 3:42 PM