संजय पाटीलअमळनेर : ठरवलेल्या लग्नाला आपल्या मित्रांनी हजेरी तर लावलीच पाहिजे आणि शासनाचे नियम पाळून कोरोनाच्या महामारीत मित्रांच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहीजे म्हणूनआर्मी स्कूलच्या एक शिक्षकाने ऑनलाईन शिक्षणाप्रमाणे शक्कल लढवून व्हाट्सअपवर पत्रिका पाठवताना झूम ऍप ची लिंक पाठवून विवाह सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.कोरोनाचा दुसरा टप्पा सलग दुसऱ्या वर्षी जोरात वाढत असताना शासनाने लग्न समारंभासह विविध कार्यक्रमाना बंधने लादली आहेत. नियमभंग केल्यास मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जातो आणि त्यात गर्दीतून कोरोना वाढून आपल्याच जवळची नात्यातील माणसे गमावण्याचे दुःखद प्रसंगही ओढवले आहेत. विविध कार्यक्रमांना फक्त पन्नासची मर्यादा घालून दिल्याने " इतका जवळचा असूनही त्या पन्नासमध्ये माझी गिनती केली नाही " या टोमण्याना अनेकांना सामोरे जावे लागते. नाती तुटतात. यामुळे या सर्वातून योग्य पर्याय काढून अमळनेर येथील विजय नाना आर्मी स्कूलचे शिक्षक सूर्यकांत बाविस्कर यांनी ऋणानुबंधही टिकून राहावे, प्रत्येकाची आरोग्याची काळजी ही घेतली जाईल व सन्मानाने विवाहाला आमंत्रित करता यावे म्हणून ऑनलाईन पत्रिका पाठवून त्यात विवाह सोहळा पाहता यावा म्हणून पत्रिकेतून झूम मिटिंगच्या ऍपची लिंक पाठवली आहे. त्यामुळे कोणी हजेरी लावली हेही कळणार आहे या माध्यमातून काहींना कमी वेळेत अनेक लग्न ही लावता येणार आहेत. काहींना जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात हजर असूनही या सोहळ्याला हजेरी लावता येणार आहे. या ऑनलाईन पत्रिकेची आणि झूम लिंकची सर्वत्र चर्चा सुरू असून सध्याच्या स्थितीत याच पर्यायांची गरज असल्याचेही बोलले जात आहे. शेवटी मास्तर तो मास्तर असतो. कोणत्याही प्रसंगात जुगाड शोधण्याची त्याची प्रवृत्ती निश्चित समाजाला दिशा देणारा ठरत असतो. याचाही प्रत्यय आला. आता या शिक्षकाचे मित्र आणि नातेवाईक लग्नाचा आहेर मात्र झूम मिटिंगने ऑनलाईन देणार की प्रत्यक्ष देणार यावरही खमंग चर्चा सुरू होती.
मास्तर तो मास्तरच! विवाह सोहळ्याचे झूम मिटिंगच्या लिंकने आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:58 AM
शिक्षकाने कोरोनापासून बचावासाठी लग्नासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
ठळक मुद्देकोरोनापासून बचावशासन नियमांचे पालनवऱ्हाडीला पहिल्या पन्नासमध्येच स्थान