आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२०-मू.जे.महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे बुधवारी आयोजित ‘मेस्ट्रो’ या राष्ट्रीय स्पर्धेत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने तीन तर केसीई सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालयाने पाच पारितोषिके पटकावित आपले वर्चस्व सिध्द केले.
या स्पर्धेत ३७ संघातील ९२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. जळ्गाव, धुळे, पुणे, नांदेड, औरंगाबाद येथील संघांचा सहभाग होता. स्पर्धेेचे उदघाटन के.सी.ई.संस्थेचे सचिव अॅड. एस.एस.फालक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. ए.पी.सरोदे, समन्वयक कल्पना नंदनवार, स्पर्धा संयोजन सचिव सुरेखा पालवे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण चार स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये आॅनलाईन स्टॉक मार्केट गेम, जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा, पॉवर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा समावेश होता.
स्टॉक मार्केट स्पर्धेत खरेदीसाठी चुरसस्पर्धेत आॅनलाईन स्टॉक मार्केट गेम स्पर्धेत ४१ संघातील ६३ जणांनी सहभाग घेतला होता. ४ तासात विद्यार्थ्यांनी कौशल्य पणाला लावीत १ करोड रुपयांपर्यतचे वेबसाईटवर शेअर खरेदी विक्री करीत स्पर्धेत रंगत आणली. जाहिरात विकास या स्पर्धेत मॅड शो, प्रो सेलो अशा राउंडमध्ये १४ संघातील ५६ जणांनी सहभाग नोंदविला. जाहिरात करणे, ती ओळखणे व जाहिरातीचे उत्पादन विक्री करणे असे प्रकार स्पर्धक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. परीक्षण आयएमआर महाविद्यालयाचे डॉ.अनुपमा चौधरी, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, धुळेचे प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले.
पीपीटी स्पर्धेत ४३ संघाचा समावेशपीपीटी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जीएसटी, मार्केटींग अशा विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण करीत परीक्षकांना जिंकून घेतले. ४३ संघातील ६६ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षण आयएमआर महाविद्यालयाचे प्रा.बी.जे.लाठी आणि प्रा. तनुजा फेगडे यांनी केले.तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सामान्य ज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, संगणकशास्त्र, अकौन्टिंग विषयी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उत्तरे दिली. समारोप ्रप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे या उपस्थित होत्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहिरात विकास प्रथम - स्नेहल बोदडे, वैभव मोरे, गिरीश मोरे, परेश भदाणे (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)द्वितीय - शुभांगी पाटील, सायली पाटील, मनीषा पाटील, कृष्णा महाजन (म.गांधी महाविद्यालय, चोपडा)तृतीय -ऐश्वर्या खंबायत, काजल चोपडे, गणेश जैन, सनी जैन (आयएमआर)उत्तेजनार्थ - धनश्री पाटील, तेजस्विनी पाटील, मयूर पाटील, तरूण पंजवानी (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)
पीपीटी स्पर्धा प्रथम - अमृता नवाल (आयएमआर)द्वितीय - साधना प्रजापत (मू.जे.महाविद्यालय)तृतीय - श्रद्धा चावला, आकृती सावनी (जी.एच.रायसोनी महाविद्यालय)उत्तेजनार्थ - एच.डी.गांधी, प्रसाद मधुसूदन (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)
आॅनलाईन स्टॉक मार्केट गेम स्पर्धा प्रथम - प्रीतेश कांकरिया, संजय प्रजापत (रायसोनी महाविद्यालय)द्वितीय - हर्षल संचेती, अभिजित शर्मा (आयएमआर)तृतीय- आकाश आबाद, शुभम नेवे ( आयएमआर)उत्तेजनार्थ - १) धनंजय सपकाळे (आयएमआर),२) अहमद रजा, तेजस पाटील (म.गांधी महाविद्यालय, चोपडा),३) परमेश्वर नाईक (गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)
प्रश्नमंजुषा स्पर्धाप्रथम -सायली देसाई,अक्षय संचेती, गौरी बबन (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव)व्दितीय - दिपक पाटील, अमोल पाटील, उमेश खडसे (नूतन मराठा महाविद्यालय)तृतीय - गौरव बारी, दिपाली बिलखेडे, कोमल ताडे (गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)