जळगाव : महिनाभरापूर्वीच पतीचे निधन झालेल्या द्रौपदी लक्ष्मण साळुंके (30) या महिलेची जळगाव रेल्वे स्थानकावरच प्रसूती झाली असून या महिलेसह नवजात बालिकेची जिल्हा रुग्णालयात देखभाल करण्यात येत आहे. कन्नड तालुक्यातील चिखलीपुरा येथील रहिवासी असलेल्या द्रौपदी साळुंके या महिलेच्या पतीचे महिनाभरापूर्वीच निधन झाले. त्यानंतर या महिलेला कोणतेच नातेवाईक नाही. त्यात ती गर्भवती. रविवारी ती जळगाव रेल्वे स्थानकावर असताना तेथेच तिची प्रसूती होऊन तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रेल्वे पोलिसांनी हलविले रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात हलविले. नातेवाईक नाहीया महिलेला कोणतेच नातेवाईक नसल्याचे ती सांगत आहे. तसेच कोठे जात होती व इतर माहिती ती सांगत नाही. नातेवाईक नसल्याने या बेवारस महिलेला परिचारिका, डॉक्टर तसेच प्रमोद झवर यांनी मदत केली. तसेच महिलेसह बालिकेची जिल्हा रुग्णालयातच देखभाल करण्यात येत आहे. अनाथाश्रमात हलविणार या महिलेला नातेवाईक नाही त्यात मुलगी, त्यामुळे या बाबत रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून व कार्यवाही करून या महिलेला जिल्हा रुग्णालयातून अनाथाश्रमात हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महिलेची रेल्वे स्थानकावरच प्रसूती
By admin | Published: February 14, 2017 12:53 AM