जळगाव : माजी आमदार गुरुमुख जगवाणी व राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच दोन कार व दोन दुचाकी असे चार वाहने मध्यरात्री जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहने जाळणारा संशयित कैद झालेला आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या घटनेत अॅड. उज्ज्वल निकम यांच्या बंगल्याच्या मागे रामदास कॉलनीत राहणारे नीरज सुरेशचंद्र छाजेड (३७) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.झेड ६१८८) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्यात आली, त्यात दुचाकी खाक झाली असून बाजूलाच लावलेली दुचाकी(क्र.एम.एच १९ ए.झेड १२३७) देखील आगीने अर्धवट जळाली. ही घटना अपार्टमेंटमध्ये राहणाºया वॉचमनच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरड केली. तातडीने पाणी टाकून ही आग विझविण्यात आली.दुसºया घटनेत माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांच्या बंगल्याच्या बाजूला राहणारे सुभोद मोतीचंद बुद्देलखंडी (५१,रा.रामदास कॉलनी) यांची कार (क्र.एम.एच १९ बी.यू ७७४४) अपार्टमेंटच्या बाहेर लावली होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास याच अज्ञात व्यक्तीने कार पेटवून दिली. आगीचे प्रमाण मोठे असल्याने अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते.तिसºया घटनेत गणपतीनगरातील शालिमार अपार्टमेंटमध्ये राहणारे गिरीष बंन्सीलाल मोतीरामाणी (३६) यांचे नातेवाईक भारत तलरेजा रा. सिंधी कॉलनी यांनी आपली कार (क्र.एम.एच १९ सी.यू ५५१५) लॉकडाऊनमुळे तेथे लावली होती. मध्यरात्री १.४३ वाजेच्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकले व पेटवून दिल्याचा प्रयत्न केला.सीसीटीव्ही कॅमेºयात आग लावल्यापासून ते आग विझविण्यापर्यंत सर्व घटना कैद झाली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे.पहिला प्रयत्न असफल; दुसऱ्यांदा पेटविली कारदरम्यान, या घटनेत संशयिताने कार पेटविली, मात्र त्यात त्याला अपयश आले. कारने पेट न घेतल्याने तो पुन्हा कारजवळ आला व कार पेटवून मुख्य गेटवरुन पळाला. बन्सीलाल मोतीरामाणी यांच्या घराच्या बाजूला राहणारे करण पोपली हे कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी उठले तेव्हा कार पेटविल्याचे लक्षात आल्याने आरडाओरड केली. अपार्टमेंटमध्ये राहणाºया नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेवून कारला लागलेली आग काही मिनीटात विझाविली.
माथेफिरुचे कृत्य ; कार, दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:48 AM