शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भुसावळातील धम्म चळवळीचे केंद्र मैत्रीसागर बुद्धविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 4:40 PM

भुसावळ शहरातील येथे शिवाजी नगरातील आजच्या मैैत्रीसागर बुद्धविहारास धम्म चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती भेटधम्मकार्यासाठी देणगी स्वरूपात वर्गणी केली होती गोळा

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील येथे शिवाजी नगरातील आजच्या मैैत्रीसागर बुद्धविहारास धम्म चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते.१९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर त्या काळातील या भागातील बौद्ध लोक बौद्ध धम्म प्रचारकार्य या ठिकाणाहून करू लागले. याच काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महान मठांमध्ये आले होते आणि येथील लोकांनी बाबासाहेबांना धम्मकार्यासाठी देणगी स्वरूपात वर्गणी गोळा करून दिली होती. काही ज्येष्ठ, जुन्या-जाणत्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नसरवानजी फाईल नागसेन वार्ड या ठिकाणी सभा झाली होती. त्या वेळेस धोंडीबा चोेैतमोल यांच्या मालकीची जागा २१-१०-१९५९ बक्षीस म्हणून देऊन बुद्ध आश्रम या नावाने ओळखली जाऊ लागली होती. त्या काळास कौलारू छताचे गळके बुद्धमंदिर होते. पावसाच्या पाण्याने आत पाणी गळत होते. तेव्हा दौलतराव हिंगणे यांनी बुद्ध आश्रमास लोखंडी पत्रे दान करून मोलाची मदत केली होती. पुढील दोन वर्षांनी राजस्थान येथून संगमरवरी आकर्षक बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली होती.१९९६-९७ या काळमध्ये या भागातील तरुण मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन धरती बौद्ध समाज संस्था या संस्थेची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष सुनील गायकवाड व सहकारी मित्रमंडळींच्या परिश्रमातून विहाराच्या नूतनीकरणास सुरुवात झाली. तेव्हापासून या बुद्ध आश्रमास मैत्रीसागर बुद्ध विहार असे नाव देण्यात आले व विहार बांधकाम सुरू झाले. धोंडीराम चोेैतमोल यांची मुले सुरेश चोेैतमोल व महेंद्र चौतमोल यांनी आपल्या राहत्या घरावरील गच्ची ताबा विहाराचा विस्तार करण्यासाठी देण्याचे कबूल केले. तेव्हा समाजातील पुढारी व समाजसेवक यांनी मोठ्या स्वरूपात रोख व साहित्य दिले. २००२ पासून अध्यक्षपद नरेश गडवे यांच्याकडे आले. तेव्हा बांधकामास वेग आला व सर्वधर्मातील मित्रमंडळाच्या सहकार्याने दोन मजले पूर्ण करण्यात आले. नरेश गडवे यांच्या कारकीर्दीतील सहकारी प्रमोद निळे हे आजतागायात विहार व्यवस्थापक म्हणून कार्यरत करीत आहे.आज मैत्रीसागर बुद्धविहार अनेक सामाजिक कार्य करीत आहे. महिला मंडळाचा सर्वाधिक सहभाग असलेल्या मैत्रीसागर आज धम्मप्रचार प्रसार कार्यासह दर रविवारी व दर पौर्णिमेस वंदना कार्यक्रम, खीरदान महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते. तसेच योगावर्ग, ध्यान वर्ग, अभ्यासिका ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे अनेक प्रकारचे समाजोपयोगी कार्य केले जात आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यासह या ठिकाणी पर्यावरणविषयक जनजागृती अभियान अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करणे असे अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व कार्यासाठी परिसरातील समाजबांधवांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या आर्थिक मदतीवर आज मैत्रीसागर बुद्धविहार विविध प्रकारे लोकहिताचे कार्य अग्रक्रमाने करीत आहे. विहारास अनेक मान्यवर येथील कार्याचे कौतुक करण्यासाठी भेटी देत असतात. भिक्खूंचा वावर असतो. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ