ऑनलाईन लोकमत जळगाव,दि.29 - मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही शाखांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचेही पेपर तपासून देण्याची तयारी उमविने दाखविली आहे. यासाठी 200संगणक सज्ज ठेवण्यात आले आहेत. 31 जुलैर्पयत निकाल जाहीर करण्याचा सूचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये तपासणीसाठी पेपर पाठविले जात आहेत. त्यानुसार उमविकडेदेखील मुंबई विद्यापीठाकडून पेपर तपासणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर उमविनेदेखील तयारी दर्शविली आहे. उमविने तयारी दर्शविल्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून काही शाखांचे पेपर उमविकडे पाठविले जाणार आहेत. रविवारी हे पेपर विद्यापीठाकडे प्राप्त होऊ शकतात. पेपर तपासण्यासाठी संबंधित विषयाच्या प्राध्यापकानादेखील सूचना दिल्या गेल्या आहेत. अवघ्या एका दिवसात मुंबई विद्यापीठातील पेपर तपासले जातील, असा दावा परीक्षा नियंत्रक प्रा.डी.एन.गुजराथी यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठातील पेपरची उमविची करणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 7:06 PM