जळगाव : शहरातील रस्त्यांचा भीषण समस्येबाबत रोटरी वेस्टतर्फे रविवारी आयोजित चर्चासत्रात महापौर सीमा भोळे व ‘नही’ चे प्रकल्पप्रमुख सी.एम.सिन्हा यांनी दांडी मारली. तर मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी या चर्चासत्राचा हजेरी लावत नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत एकटाच किल्ला लढविला.रोटरीतर्फे रविवारी मायादेवीनगरातील रोटरी भवन येथे ‘जळगावकरांच्या त्रासाबाबत जबाबदर कोण ? ’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासाठी महापौर सीमा भोळे व ‘नही’ चे अधिकारी सी.एम.सिन्हा यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, महापौर व सिन्हा हे या चर्चासत्राला गैरहजर राहिले. मात्र, आयुक्त डॉ.उदय टेकाळे मनपा संबधी उपस्थित करण्यात आलेल्या हुडको कर्ज, एमआयडीसीच्या समस्या, रस्त्यांमधील खड्डयांचा समस्या अशा सर्व प्रश्नांवर उत्तरे दिली.या कार्यक्रमाला येण्यासाठी सिन्हा यांचा रविवारी सकाळपर्यंत होकार होता. नंतर दुपारी त्यांचा फोन बंद येत होता. त्यांची वाट पाहत कार्यक्रम उशिराने सुरु झाला तरीही ते आले नाहीत, अशी माहिती गनी मेमन यांनी पत्रकारांना दिली.‘नही’ च्या अधिकाऱ्यांचा निषेधया चर्चासत्राला ‘नही’ चे अधिकारी उपस्थित नसल्याने जहॉगिर खान यांनी ‘नही’ चे अधिकारी सिन्हा यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. राष्टÑीय महामार्गावर खड्डयांमुळे मी व माझी पत्नी बालंबाल बचावल्याचे सांगत, खड्डयांकडे दुर्लक्ष करणाºया ‘नही’ च्या अधिकाºयांविरोधात खान यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर अॅड.सुरज जहांगीर , उद्योजक किरण राणे यांनी देखील एमआयडीसी, शहरातील रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच आमदार सुरेश भोळे हे या चर्चासत्राला उपस्थित होवू शकले नसले तरी त्यांनी पत्राव्दारे आपण शहराच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील चर्चासत्रात सर्व नागरिकांचे प्रश्नांचे उत्तर देण्यास बांधिल राहणार असल्याचे आश्वासन आमदार भोळे यांनी रोटरीच्या सदस्यांना दिले असल्याची माहिती गनी मेमन यांनी दिली.कर्ज घेतले नसते तर झोपडपट्टीचा प्रश्न सुटला नसता...मनपा आयुक्तांना उपस्थित नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यानंतर आयुक्तांनी ‘मी एकटा आरोपी’ नसून मला आरोपीसारखे प्रश्न उपस्थित करू नका असे आयुक्तांनी सांगितले. तसेच मनपासमोर सध्यस्थितीस मुख्य समस्या ही आर्थिक समस्या असून हुडको कर्जाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन व शासनाकडून सुरु आहे. तसेच नगरपालिकेने कर्ज का घेतले असाही प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, तेव्हा कर्ज घेवून झोपडपट्टीचा प्रश्न सोडविला नसता तर आजही शहरात झोपडपट्टीची समस्या कायम राहिली असती असे आयुक्तांनी सांगितले.
महापौर आणि ‘नही’च्या अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:34 PM