शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

महापौरांनी ‘बांधकाम’कडे रस्ते दुरुस्तीची केली होती मागणी

By admin | Published: April 07, 2017 12:55 AM

रस्त्यांची मालकी बदल प्रकरण : तत्कालीन पालिकेने केलेला ठरावही ‘लोकमत’ला प्राप्त

जळगाव : शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यांना मिळणारे मुख्य रस्त्यांचे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची मागणी महापौर नितीन लढ्ढा यांनी २६ जुलै २०१६ रोजीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.  त्यात शासनाने आता अवर्गीकृत केलेल्या (मालकीत बदल केलेल्या)  रस्त्यांचाही समावेश होता. दरम्यान तत्कालीन नपाने रस्त्यांची मालकी बदलाबाबत केलेला ठरावही ‘लोकमत’च्या हाती लागला असून अवघ्या चार-पाच ओळींच्या या ठरावात सार्वजनिक बांधकाम व जि.प.च्या मालकीचे रस्ते ताब्यात घेण्याची कार्यवाही मुख्याधिकाºयांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर लढ्ढा यांनी जुलै २०१६ मध्ये पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांना मिळणारे प्रमुख मार्ग आहेत. हे रस्ते शहराच्या आजूबाजूस असलेल्या विविध लहान गावांना जातात. तसेच शहरातून राष्टÑीय महामार्ग क्र.६ देखील आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, तसेच या ठिकाणाहून शहरातील भाग व जवळपासच्या इतर मार्गास जोडणाºया रस्त्यांना दिशादर्शक नाहीत. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करणे व दिशादर्शक कमानी उभारणे आवश्यक आहे. हे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत प्रस्तावित करण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली होती. या रस्त्यांचा होता समावेश१) जळगाव रेल्वे स्टेशन शिवाजीनगरमधील जुनी जिनींगपासून लाकडी वखारकडून कानळदा गावाकडे जाणारा रस्ता.२) शिवाजीनगर मराठी शाळा क्र.४ पासून इदगाव राज्यमार्गाला मिळणाºया रस्त्याची सुधारणा करणे.३) शिरसोली नाक्यापासून ते पाचोºयाकडे जाणाºया रस्त्याची सुधारणा करणे.४) लेंडीनाला रिधूरवाड्यापसनू ते रेल्वे क्रॉसींगपर्यंत (असोद्याकडे जाणारा रस्ता)५) रामानंदनगरच्या खालून श्रीधरनगर ते रेल्वे बोगद्यापर्यंतचा रस्ता६) जळगाव-मोहाडी-लमांजन-म्हसावद-बोरनार (प्रस्तावित जिल्हा मार्ग ३९)७) गिरणाटाकी ते विद्युतकॉलनीकडून शासकीय अभियांत्रिकीच्या मागून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता.८) कालंकामाता चौक ते पांझरापोळ संस्थानपर्यंतचा रस्ता. 

काय होता नपाचा ठराव?तत्कालीन नगरपालिकेने ३ आॅगस्ट २००१ मध्ये केलेल्या या ठरावात म्हटले आहे की, नगरपालिका अभियंता व तांत्रिक सल्लागार यांचे ३१ जुलै २००१चे जळगाव पालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्या मालकीचे रस्ते ताब्यातत घेण्याबद्दलचे प्रतिवेदन वाचले. त्यात नमूद केलेले व व खालील दर्शविलेले रस्ते ताब्यात घेण्यास सभा मंजुरी देत आहे. याबद्दल मुख्याधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी. १) जळगाव-नेरी रस्ता नगरपालिकाहद्दीपर्यंत.२) जळगाव-शिरसोली रोड क्रॉसींगपासून मोहाडी रोड नपा हद्दीपर्यंत.३) जळगाव-ममुराबाद रस्ता नगरपालिका हद्दीपर्यंत.४)जळगाव-कानळदा रस्ता नगरपालिका हद्दीपर्यंत.५)जळगाव असोदा रस्ता नगरपालिका हद्दीपर्यंत.६)जळगाव-निमखेडी-पाळधी रस्ता जुना नॅशनल हायवेपर्यंतचा रस्ता.  

रहिवासी भागात दारु दुकानांना ना हरकत न देण्याचा भाजपा नगरसेवकाचा प्रस्तावमहापालिकेच्या हद्दीमध्ये देशी, विदेशी दारू आणि बियरबारला, मद्य विक्रीच्या दुकानास महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा प्रस्ताव पालिकेतील भाजपाचे नगरसेवक रवींद्र चंद्रकांत पाटील यांनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या महासभेत ठेवला होता.  आता दारू विक्रेते, बियरबारचालक रहिवासी भागात जागा शोधत असून, त्याचा पालिका हद्दीत रहिवाशांना मोठा त्रास होईल. भविष्याचा विचार करता अशा दारू विक्री दुकाने, बियरबार्सना रहिवाशी भागात ना हरकत महापालिकेने देऊ नये, असा ठराव मंजूर झाला होता. तसेच असे प्रस्ताव असतील तर ते महासभेपुढे ठेवले जावेत, असेही ठरले होते. या प्रस्तावाच्या बाजूने ६१ मते पडली. तर प्रतिकूल एकही मत नव्हते. नगरसेवक नितीन बरडे यांनी या ठराव अनुमोदन दिले होते. एकीकडे भाजपाचे नगरसेवक रहिवासी भागात दारू विक्री दुकाने, बियरबार सुरू होऊ नयेत यासाठी महासभेत ठराव करतात... प्रस्ताव देतात... दुसºया बाजूला भाजपाचेच आमदार सुरेश भोळे यांनी दारू विक्रीची दुकाने, बियरबार हे महापालिकेच्या हद्दीत सुरू राहावेत यासाठी सहा रस्त्यांची मागणी मनपाकडे सोपविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.  यामुळे भाजपात दारू विक्री दुकानांसंबंधी वेगवेगळ््या भूमिका असल्याचेही स्पष्ट झाले आहे.