जळगाव : भाजपच्या महानगराध्यक्षपदाची निवड शुक्रवारी होणार आहे. याापदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. शुक्रवारी ही निवड होणार असली तरी या निवडीवर मनपाचा महापौरपदाचा उमेदवारठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या पदासाठी अनेक नावे शर्यतीत आहे. अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी व भाजपचे संघटन मंत्रीच घेणार आहेत.दरम्यान, ११ जानेवारी रोजी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार आहे. महानगराध्यक्षपदासाठी भाजपत जोरदार रस्सीखेच असून विद्यमान अध्यक्ष आमदार सुरेश भोळे, विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल, ‘बेटी बचाव,बेटी पढाव’च्या राज्य समन्वयिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील, दीपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी यांच्यात स्पर्धा लागली आहे. खडसे गटातील पदाधिकारी या निवडीपासून अलीप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जातिनिहाय आखले जाणार गणितएकीकडे महानगराध्यक्षपदाची निवड केली जात असताना, दुसरीकडे महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे हे या महिन्याचा शेवटी राजीनामा देणार असून, महानगराध्यक्षपदाच्या निवडीवर महापौर, उपमहापौरपदाचेही गणित ठरणार आहे. आमदार चंदूलाल पटेल यांना महानगराध्यक्षपद मिळाल्यास महापौरपद हे मराठा किंवा कोळी समाजाच्या नगरसेवकाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर राजपूत व मराठा समाजाच्या सदस्याला महानगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास महापौरपद हे कोळी समाजाला दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमहापौरपदाचे गणित हे महापौरपदाचे नाव निश्चित केल्यानंतरच केले जाणार आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदूलाल पटेल व दीपक सुर्यवंशी यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. तर आमदार भोळे हे देखील पुन्हा महानगराध्यक्षपदासाठी आग्रही असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
महानगराध्यक्षपदावर ठरणार महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:13 PM