शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

महापौरांनी हात झटकले

By admin | Published: February 10, 2017 12:40 AM

समांतर रस्ते कृती समिती सोबत तासभर चर्चा :

जळगाव : समांतर रस्त्यांची जागा महापालिकेच्या ताब्यात नाही, आणि ताबा मिळाला तरी आर्थिक परिस्थितीमुळे हे काम करणे अशक्यच आहे तसेच महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारीही मनपाची नव्हे तर महामार्ग प्राधिकरणाची असल्याचे स्पष्ट करीत महापौर नितीन लढ्ढा यांनी हात झटकले. त्यामुळे समातंर कृती समितीसह जळगावकरांचा पुरता भ्रमनिरास झाला.तांत्रिक स्वरूपाची जी काही मदत असेल ती मनपा करेल. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. समांतर रस्ते कृती समितीने गुरूवारी दुपारी 12 वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या दालनात रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. यावेळी त्यांनी हतबलता व्यक्त केली.अनेक सदस्यांची उपस्थितीचर्चेदरम्यान, डॉ. राधेश्याम चौधरी,  नगरसेवक कैलास सोनवणे, गजानन मालपुरे, नगरसेवक अनंत जोशी, विनोद देशमुख, फारूक शेख, दिलीप तिवारी, विराज कावडिया, अमित जगताप, मितेश गुजर, सरिता माळी, भुषण सोनवणे, पियुश पाटील, अजिंक्य देसाई, तेजस्विनी महाजन, मंगला बारी, मुविकोराज कोल्हे यांच्यासह अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. जमीन मनपाच्या ताब्यात नाहीमहामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही ‘नही’ची आहे. जिल्हाधिका:यांकडे बैठक झाली त्यावेळी मनपाने अतिक्रमणे काढण्यासाठी मनुष्यबळ देण्याचे व पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढाकार हा प्राधिकरणालाच घ्यावा लागेल. सध्याचा रस्ता बळकटीकरण व समांतर रस्त्याचे काम सुरू केले तरी मनपाचा कोणताही अडथळा नसेल. कोणतीही जमीन ही मनपाच्या ताब्यात नाही. तशी अडचण आलीच तरी आम्ही तसे हमीपत्र देऊ व जागेचा ताबा तत्काळ देऊ, असेही लढ्ढा यांनी स्पष्ट केले.

 चुकीच्या माहितीवरुन प्रतिज्ञापत्र दिले..कृती समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या  विषयांना उत्तर देताना महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर काहीही करण्याचा मनपास अधिकार नाही. मनपा समांतर रस्ते करू शकत नाही. यात अनेक बाबी तांत्रिकदृष्टया गुंतागुंतीच्या आहेत. तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी उच्च न्यायालयात समांतर रस्त्याप्रकरणी चुकीच्या माहितीवरून प्रतिज्ञापत्र दिले आहे. मनपाने नंतर ते पत्र मागे घेऊन समांतर रस्ते करू शकत नाही असेही न्यायालयास कळविले आहे. याची कागदपत्रेही त्यांनी यावेळी सदस्यांना दाखविली. गडकरींकडे पाठपुरावा करुकृती समितीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. सर्व मिळून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून  काम सुरू करण्याबाबचे आदेश देण्याची मागणी करू असे लढ्ढा यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अभियंता सुनील भोळे, भास्कर भोळे उपस्थित होते.