शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

महापौर आमचाच होईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:16 AM

दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचे दावे-प्रतिदावे : सेनेकडून जयश्री महाजन निश्चित मात्र भाजपकडून अजूनही उमेदवाराची घोषणा नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचे दावे-प्रतिदावे : सेनेकडून जयश्री महाजन निश्चित मात्र भाजपकडून अजूनही उमेदवाराची घोषणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असतानाच भाजपमध्ये उभी फूट पडल्याने आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना व भाजपकडून महापौर आमचाच होईल, असे दावे केले जात आहेत. शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदासाठीचे उमेदवार जाहीर केले असले तरी भाजपकडून मात्र अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दोन्ही ही पक्षांकडून होत असलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे, तर उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र, भाजपकडून कोणतेही नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. प्रतिभा कापसे यांचे नाव आघाडीवर असून, उपमहापौरपदाबाबत मात्र पक्षात अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. गटनेते भगत बालाणी, सुरेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील, धीरज सोनवणे यांचे नाव आघाडीवर असले तरी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजपकडून ऐनवेळी महापौर व उपमहापौरपदासाठीच्या नावात ऐनवेळी बदलदेखील होण्याची शक्यता आहे.

जयश्री महाजन

जयश्री महाजन या प्रभाग क्रमांक १५ मधून विजयी झाल्या आहेत. मनपात सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या असून, याआधी महिला व बालकल्याण समितीत सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे. सेनेचे विद्यमान मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या त्या पत्नी आहेत.

मजबूत बाजू

शिवसेनेकडून दावा केला जात असल्याप्रमाणे भाजपचे २७ नगरसेवक फुटले असतील तर जयश्री महाजन यांच्याकडे एमआयएम चे ३ व शिवसेनेचे १५ नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा ४५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासह लेवा समाजातील उमेदवार असल्याने भाजपतील इतर मतेदेखील फुटण्याची शक्यता.

उणिवा

भाजपकडूनही सत्तास्थापनेचा दावा केला जात आहे. त्यातच भाजपचे २/३ एवढे नगरसेवक न फुटल्यास त्या नगरसेवकांवर अपात्रतेची करवाई झाल्यास महाजनांना अडचणी येऊ शकतात. तसेच भाजपकडून फुटलेल्या काही नगरसेवकांना पुन्हा पक्षाकडे खेचल्यास काही मतांची कमतरता महाजन यांना पडू शकते.

प्रतिभा कापसे

प्रतिभा कापसे प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपकडून विजयी झाल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. याआधी राष्ट्रवादीकडून त्या विजयी झाल्या होत्या. २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मजबूत बाजू

सर्वांत मजबूत बाजू म्हणजेच सद्य:स्थितीत कापसे यांच्याकडे ३२ हून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा आहे. तसेच हा आकडा ४० पेक्षा अधिक असेल असा दावाही भाजपकडून केला जात आहे. त्यातच भाजपच्या काही फुटलेल्या नगरसेवकांनीही कापसे यांच्या नावाला विरोध नसल्याचे सांगत उपमहापौरपदाच्या सुरेश सोनवणे यांच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले. यामुळे ऐनवेळी निवडणुकीत काही नगरसेवक पुन्हा परतण्याची शक्यता.

उणिवा

सद्य:स्थितीत भाजपमधील फूट कापसे यांच्यासह भाजपची डोकेदुखी ठरत आहे. भाजपकडून बहुमताच्या आकड्याचा दावा केला जात असला तरी मोठा गट शिवसेनेला जाऊन मिळाल्याने महापौरपदापासून दूर राहण्याचीही शक्यता आहे.

कुलभूषण पाटील

पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर विजयी झाले असून, याआधी २०१३ मध्ये देखील त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख म्हणूनदेखील काही वर्षे काम पाहिले. २०१८ च्या निवडणुकीच्या वेळेस कुलभूषण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.