कुंदन पाटील/जळगाव: विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. श्रमिक कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी, ठेका पद्धत बंद व्हावी, आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय श्रमनिती तयार करावी, ‘किमान वेतन’ऐवजी ‘जीवन वेतन’ पद्धत लागू करावी या मागण्यांसाठी बुधवारी देशभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून स्थानिक पदाधिकारी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर लाक्षणिक उपोषणाला बसले.
आंदोलनात सुरेश सोनार, प्रवीण अमृतकर, पी.जे.पाटील, किरण पाटील, सचीन लाडवंजारी, विकास चौधरी, पंकज पाटील, राधा नेतले, सोनाली ठाकरे, कमलेश सोनवणे, संगीता बारस्कर, गोपाल शार्दुल आदींनी सहभाग घेतला.