मुक्ताईनगर: येथील खडसे महाविद्यालयातील कोविंड रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट प्रतीचेो जेवण मिळाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिनी खडसे- खेवलकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन केलेल्या आंदोलनानंतर व जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदाराचा जेवणाचा ठेका रद्द करण्यात आला आहे. हा ठेका शिवभोजन थाळी केंद्र चालकाचा होता. दरम्यान तीन दिवसात अर्ज मागवून नवीन ठेकेदारास जेवणाचा ठेका देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शाम वाडकर यांनी दिली.खडसे महाविद्यालयात असलेल्या कोविंड रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्रार रोहिनी खडसे- खेवलकर यांना मिळाल्यानंतर २४ आॅगस्ट रोजी त्यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रूग्णालयाच्या दारातच आंदोलन केले. याप्रसंगी तहसीलदार शाम वाडकर यांना देखील बोलविण्यात आले होते. रुग्णालयाच्या खिडक्यांमधून रुग्णांनी मिळालेले निकृष्ट प्रतीचे व अळ्या असलेले जेवण याप्रसंगी प्रशासनाच्या समोर दाखवले. तसेच प्रोटीन युक्त जेवण मिळत नाही शुद्ध प्यायला पाणी मिळत नाही अशा तक्रारी देखील रुग्णां तर्फे करण्यात आल्या होत्या. सदर आंदोलन तब्बल दोन तास चालले होते.यासंदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील प्रत्यक्ष रुग्णालयात भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केले होते.
कोविड रुग्णालयातील भोजनाचा ठेका रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:42 PM